Praniti Shinde
Praniti Shinde 
पश्चिम महाराष्ट्र

माध्यमेही विकली गेलेली : आ. प्रणिती शिंदे

भारत नागणे

पंढरपूर : देशातील आणि राज्यातील टीव्ही चॅनल आणि वर्तनमानपत्रे ही विकली गेली आहेत. त्यामुळेच कोणतीही सत्य गोष्ट सर्वसामान्य माणसापर्यंत पोचू शकत नाही असे वादग्रस्त व धक्कादायक वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात केले. त्यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे 25 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांची कन्या आणि काॅगेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचार दौरा सुरू केला आहे.

आज सकाळी कासेगाव येथील एका सभेत बोलताना आमदार शिंदे यांनी मागील निवडणूकीतील अपयशाचे खापर मिडीयावर फोडले.

यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणूकीत सोशल मीडियाचा वापर करून खोटी आश्वासने दिली. खोट्या आश्वासनाला बळी पडून लोकांनी मोदीला निवडून दिले. गेल्या पाच वर्षांत एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. उलट शेतकऱ्यांची ससेहोलपट झाली. शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत.

अशा गोष्टीमुळे सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे. काँग्रेसनी केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोचत नाहीत. देशातील टीव्ही चॅनेल आणि वर्तनपत्रे मोदीने विकत घेतली आहेत. अशी टिप्पणी करत त्यांनी थेट मिडीयावर निशाना साधला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष प्रकाश तात्या पाटील, जिल्हा युवकाचे अध्यक्ष नितीन नागणे, सेवा दलाचे अध्यक्ष नागेश फाटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT