MLA tambe dance on the song of thorat
MLA tambe dance on the song of thorat 
पश्चिम महाराष्ट्र

(video) : "लई जोरात..बाळासाहेब थोरात..' गीतावर आमदारांनी धरला ठेका! 

आनंद गायकवाड

संगमनेर : "इस बंदे में है कुछ बात.. ये बंदा लई जोरात.. बाळासाहेब थोरात' या महाराष्ट्राचा लाडका गायक व संगीतकार अवधुत गुप्ते यांनी तयार केलेल्या गाण्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उठवला होता. शहरातील यशोधन मैदानावर सोमवारी (ता.13) रात्री झालेल्या "लाईव्ह-शो'मध्ये इतर गाण्यांसह संगमनेरात लोकप्रिय ठरलेले हे गाणे सादर झाले नि बेभान झालेल्या प्रेक्षकांनी जल्लोषात नृत्य करून धमाल केली. त्यावेळी व्यासपीठावर बसलेले आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे व इंद्रजित थोरात यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.

"विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती..' या गाण्यावर महाराष्ट्राचा रॉकस्टार अवधुत गुप्ते यांनी दिमाखात "स्टेज'वर "एन्ट्री' केली. तेथून गुप्ते यांनी प्रेक्षकांच्या मनाचा घेतलेला ठाव अखेरपर्यंत कायम राहिला. "बाई, बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला', "जिथे तिथे रुप तुझे दिसू लागले..' या गीतांनी धमाल उडवून दिली. स्वराची ताकद दर्शवणाऱ्या "काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार' या गीतावर आबालवृद्धांसह महिलांनीही ठेका धरला. 

"सत्यजीत आला' या गीताला प्रतिसाद

शेतकरी आत्महत्येवर सादर केलेल्या "पत्रास कारण की, बोलण्याची हिंमत नाही, पावसाची वाट बघण्यात आता काही गंमत नाही..' या गीताने वातावरण एकदम गंभीर झाले. पार्श्‍वगायिका जान्हवी प्रभू अरोरा यांच्या "ई-मेल काल इंटरनेटवर केला' या लावणीने कार्यक्रमात रंगत आणली. "आम्ही लग्नाळू', "शोले' चित्रपटातील "मेहबूबा मेहबूबा' या अजरामर गीतांसह सत्यजीत तांबे यांच्यावरील "सत्यजीत आला रे, सत्यजीत आला' या गीताला तरुणांनी अक्षरक्ष: डोक्‍यावर घेतले.

"वन्स मोअर'ची दाद

या सर्वावर कडी करीत "लई जोरात.. बाळासाहेब थोरात' या प्रचारगीताने वातावरणात आगळेवेगळे चैतन्य निर्माण झाले. शिट्ट्या, टाळ्यांचा पाऊस पडत होता. जवळपास सर्वच उपस्थितांनी नृत्याचा आनंद घेतला. "वन्स मोअर'ची दाद गायक व संगीतकारांना उल्हसित करुन गेली. 

आमदार डॉ. सुधीर तांबे, ऍड. माधवराव कानवडे, शिवाजी थोरात, कांचन थोरात, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, शरयू देशमुख, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथीली तांबे, विश्‍वास मुर्तडक, सुनंदा जोर्वेकर, सुवर्णा मालपाणी, ललिता मालपाणी, अनिल शिंदे, जगन्नाथ घुगरकर, डॉ. प्रतापराव उबाळे आदी उपस्थित होते. सिनेअभिनेत्री अनुश्री फडणीस यांनी निवेदन केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

SCROLL FOR NEXT