sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

खासदार संजय पाटील आले, फक्त हजेरी लावून निघून गेले

मूळ कार्यक्रमात मात्र ठरवून एका कोपऱ्यात बसले. कार्यक्रम संपताच निघून गेले.

अजित झळके

सांगली : भाजप जिल्हा कार्यालयाच्या उद्‍घाटन समारंभास खासदार संजय पाटील आले. वेळेच्या आधी पोहोचले. गप्पांत सहभागी झाले. मूळ कार्यक्रमात मात्र ठरवून एका कोपऱ्यात बसले. कार्यक्रम संपताच निघून गेले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘दूत’ पाठवला, मात्र त्याआधीच ते रवाना झाले होते. चंद्रकातदादांच्या नजरेतून ही वाढती दरी सुटली नाही. (Sangali News)

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संग्रामसिंह देशमुख यांच्या खासगी जागेत आज भाजपचे जिल्हा कार्यालय सुरू झाले. खासदार पाटील त्या समारंभास उपस्थित राहिले, मात्र एरवी समारंभांच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या खासदारांनी आज कोपऱ्यात जागा पकडली. आमदार विलासराव जगताप यांनी त्यांना सक्तीने मास्क लावायला लावला. समारंभात जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि चंद्रकांतदादा दोघांचीच भाषणे झाली, त्यामुळे खासदारांना मनोगत व्यक्त करण्याचा विषय आला नाही. कार्यक्रम संपताच ते मिरजेकडे रवाना झाले.

चंद्रकांतदादा पत्रकार परिषद घ्यायला कार्यालयात गेले. तेथे जाताच त्यांनी ‘संजयकाका कुठे गेले?’ असे विचारले. ते मिरजेला जात असल्याचे समजताच त्यांनी माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड यांना ‘दूत’ म्हणून त्यांना बोलवायला पाठवले. गरूड बाहेर गेले, मात्र त्याआधी संजयकाका रवाना झाले होते. गरूड यांनी तसा निरोप चंद्रकांतदादांना दिला. त्यावर दादा म्हणाले, ‘‘तुम्ही त्यांना भेटण्याआधीच ते गेले होते का?’’ या प्रश्‍नाचा अर्थ सरळ होता, ‘मी बोलावले आहे, असा निरोप आल्यानंतरही ते गेले नाहीत ना?’

जगतापांना खुर्ची दिली

आमदार विलासराव जगताप यांनी नुकताच खासदार संजय पाटील यांचा उल्लेख ‘घातकी मित्र’ असा केला होता. त्याच जगताप यांना खासदारांनी आज लांबून आणून खुर्ची दिली. ते बसल्यावर आपण दुसरी खुर्ची घेतली. त्यांच्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. जगताप यांना याबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘‘राजकारणात टीका केली म्हणजे कुणी शत्रू होत नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Bacchu Kadu : निष्ठा मायबापावर ठेवा, नेता व त्यांच्या पक्षावर नाही!

Latest Marathi News Live Update: मुंबईत तीन दिवस पाणी कपातीचे संकट

SCROLL FOR NEXT