Murder in Shrirampur 
पश्चिम महाराष्ट्र

श्रीरामपुरात तृतीयपंथीयाचा खून 

सुनील नवले

श्रीरामपूर : बाजार समितीच्या आवारात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या अश्‍विनी नूरजहॉं शेख (वय 45, रा. श्रीरामपूर) या तृतीयपंथीयाचा आज नगर येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खबरीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी, की अश्विनी शेख याचे प्रवरा कालव्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत घर आहे. दुर्धर आजाराने त्रस्त असल्याने तो कॉंग्रेस भवन परिसरात आपल्या सहकाऱ्यांसोबत राहत होता. आजारपणामुळे त्याची प्रकृतीही खालावली होती. 17 ऑक्‍टोबर रोजी तो बाजार समिती परिसरात जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या डोक्‍याला मोठी जखम होती. त्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

वैद्यकीय अहवालावरून खुनाचा गुन्हा 
या प्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याचा मृत्यू कशाने झाला याचा वैद्यकीय अहवाल डॉक्‍टरांकडून मागविण्यात आला होता. हा अहवाल नुकताच प्राप्त झाला. अहवालावरून अज्ञात व्यक्तीने काहीतरी टणक वस्तूने डोक्‍यात मारहाण केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार काल (ता. 29) शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार सुरेश मुसळे करीत आहेत. 

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले 
डोक्‍यात टणक वस्तूने मारहाण झाल्याने अश्विनी शेख याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी शेखच्या सहकाऱ्यांचे जबाब, तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून या घटनेचा तपास केला जात आहे. 
- संभाजी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Samsung Discount Offer : चक्क 24 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट; सॅमसंगच्या 'या' प्रीमियम स्मार्टफोनवर बंपर सूट

SCROLL FOR NEXT