nagarkar gaves huge response to clean app marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

स्वच्छता "ऍप'वर प्रतिक्रियांचा पाऊस 

अमित आवारी

नगर : शहरातील स्वच्छतेबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी नगरकरांसाठी मोबाईल ऍपची सोय करण्यात आली आहे. "एसएस-2020 वोट फॉर युअर सिटी' असे या ऍपचे नाव असून, ते "प्ले स्टोअर'वर उपलब्ध आहे. दरम्यान, या ऍपला मोठा प्रतिसाद मिळत असून, आजअखेर आठ हजार लोकांनी नोंदणी केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही महापालिकेने या ऍपवर नोंदणीचे आवाहन केले होते. त्यास भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे नगर शहर राज्यात पहिल्या तीनमध्ये आले आहे. 

केंद्राचे पथक शहरातील स्वच्छतेची तपासणी करतानाच नागरिकांशी संवाद साधत आहे. नागरिकांना थेट प्रतिक्रिया नोंदविता याव्यात, यासाठी शासनाने मोबाईल ऍप तयार केले आहे. "एसएस-2020 वोट फॉर युअर सिटी' या ऍपवर नागरिकांना नाव व मोबाईल क्रमांक टाकून प्रश्नांची उत्तरे देता येणार आहेत. अधिकाधिक प्रतिक्रिया नोंदवाव्यात, यासाठी महापालिकेनेही पुढाकार घेतला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी नागरिकांशी संपर्क साधण्याच्या सूचना केल्या आहेत. 

अतिरिक्‍त 150 गुण मिळणार

महापालिकेने शहरातील नऊ महाविद्यालयांत "ऍप'वर नोंदणीचे आवाहन केले. स्वच्छता सर्वेक्षणात "ऍप'वर नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्यास, अतिरिक्‍त 150 गुण मिळतात. याचा फायदा नगरला "थ्री स्टार' व त्यापेक्षा जास्त रॅंकिंग मिळण्यास होणार आहे. महापालिकेने प्रत्येक विभागाला एका महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना "ऍप'वर प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. शहरातील नगरसेवक, महापालिका कर्मचारी, समाजसेवकांनीही नागरिकांना नोंदणीचे आवाहन केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

विचित्रच! जाहिरातीचं शूटींग अन् खांदा निखळला; स्टार खेळाडू IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, वाढली डोकेदुखी

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Numerology: मूलांक १ असलेल्या लोकांवर का असते श्री गणेशांची कृपा?गणपती बाप्पा अन् अंक १ चा काय आहे संबंध?

SCROLL FOR NEXT