Maracde 
पश्चिम महाराष्ट्र

असा उखाणा तुम्ही ऐकलाय का? (व्हिडिओ) 

श्रीकांत मेलगे

मरवडे (सोलापूर) : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना, राष्ट्रवादीने फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेत सत्ता काबीज केली. या राष्ट्रवादीची आता साऱ्यांनाच भुरळ पडलेली दिसत आहे. मरवडे (ता. मंगळवेढा) येथील नीलेश गुराप्पा स्वामी या नवरदेवाने घेतलेला राष्ट्रवादीप्रेमी उखाण्याने तर सोशल मीडियावर आता चांगलाच धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा : विश्‍वास ठेवा! संस्था नोंदणी होते फक्त 53 रुपयांतच 
हा आहे उखाणा
 
मरवडे येथील नीलेश स्वामी यांचा विवाह रविवारी निवर्गी (ता. चडचण, जि. विजयपूर) येथे आरती सुभाष स्वामी (येळगी, ता. जत) यांच्याशी झाला. या विवाह सोहळ्यात नवरदेव नीलेश याने "नंदीचं नाव असतंय महादेवाच्या आधी, आरतीचे नाव घेतो मी प्रचंड आशावादी... मी राष्ट्रवादी... मी राष्ट्रवादी!' असा उखाणा घेतला. हा उखाणा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने त्यास नेटिझन्सची तुफान पसंती मिळत आहे. नवरदेव नीलेश स्वामी हे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस आहेत. 

हेही वाचा : साहेब, आम्ही व्याजाने पैसे काढतो 
घरा-घरांतही राष्ट्रवादी 

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या 80व्या वर्षी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करीत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार व प्रसार प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून केला, तर देशातील प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रवादी पोचेल, असा विश्‍वास नवरदेव नीलेश स्वामी यांनी व्यक्त केला. 

नवरदेवाने घेतला असा उखाणा... 
नंदीचं नाव असतंय महादेवाच्या आधी, 
आरतीचे नाव घेतो मी प्रचंड आशावादी, 
मी राष्ट्रवादी... मी राष्ट्रवादी...! 

नवरीने असा घेतला उखाणा... 
नाव घे नाव घे असं म्हणताय तुम्ही, 
म्हणून नाव घेते मी आत्ता... 
महाराष्ट्रात आलीय पवार साहेबांची सत्ता... 
अन्‌ नीलेशरावांच्या घरात आता माझीच सत्ता...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Customs Duty: भारतातून आणलेल्या सामानावरील शुल्क सवलत वाढली! नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; सीमेलगतच्या नागरिकांना मोठा फायदा

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध कशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? कधी आणि कुठे होणार सामना, जाणून घ्या

Thane News: साप चावला, रूग्णालयात पोहोचण्यास विलंब; कुटुंबापासून चिमुकला हिरावला

Latest Marathi News Live Update : 12 जून रोजी ‘मशाल आंदोलन’ करण्याचा इशारा

Krunal Pandya: हार्दिक आणि कृणालमध्ये खरंच दुरावा आला आहे? अखेर मोठ्या भावानेच सांगितले संपूर्ण सत्य, म्हणाला आमच्यात वाद...

SCROLL FOR NEXT