पश्चिम महाराष्ट्र

आर. आर. आबांचे 'हे' स्वप्न राष्ट्रवादी पूर्ण करणार का?

अक्षय गुंड

माढा (जि. सोलापूर) : गावोगावी निर्माण होणारे छोटे-मोठे तंटे गावातच संपवावेत. या उद्देशाने तत्कालीन आघाडी सरकारने माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. राज्यातून या योजनेला प्रतिसादही चांगला मिळाला. परंतु, गेली पाच वर्षे फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादीने सुरू केलेली ही तंटामुक्ती मोहीम थंडावली असून, तंटामुक्ती गाव समित्या फक्त नावपुरत्याच उरल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादी सत्तेत आल्याने तंटामुक्ती समिती योजना प्रभावीपणे राबविणार का? उत्सूकता आहे. 

तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून 2007 साली महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राज्यभर सुरू करण्यात आले होते. गावात निर्माण होणारे छोटे-मोठे तंटे पोलीस ठाण्यात जाण्याअगोदरच गावातच संपुष्टात आणण्याचा अभिनव प्रयोग याद्वारे राबविण्यात आला होता. गावपातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम ठेवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. यातून कित्येक वाद-विवाद समझोत्याने संपून गावोगावी शांततेची नांदी दिसू लागली होती. तंटामुक्ती गावांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात होती. त्यामुळे गावागावांमध्ये तंटामुक्त गाव होण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसायची. तंटे गावातच मिटू लागल्याने पोलिसांवरचा ताण देखील कमी होऊ लागला होता. परंतु 2014 ला सरकार बदल्यानंतर इतर योजना जशा थंड बस्त्यात जातात, त्याप्रमाणेच तंटामुक्ती योजनेची अवस्था झाली. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या योजनेत रस नसल्याने मागील पाच वर्षाच्या काळात या अभियानाला एकदाही प्रोत्साहन दिलेले दिसून आले नाही. शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपंचायतींमध्येही तंटामुक्त अभियानाबाबत निरूत्साह दिसून आला. त्यामुळे तंटामुक्त समिती नावलाच आहे, का असा प्रश्न पडला होता. माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी त्यांच्या कारकीर्दीत या योजनेसाठी बरीच मेहनत घेतली होती. पण फडणवीस सरकारच्या दुर्लक्षपणामुळे आघाडी सरकारच्या या योजनेला उतरती कळा लागली. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा सत्तेत आल्याने आर. आर. पाटील यांची संकल्पना असलेली तंटामुक्त गाव ही मोहीम बळकट करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विद्यमान सरकारने लक्ष द्यावे : झाडबुके 
तंटामुक्ती समित्या फक्त कागदोपत्रीच राहिल्या आहेत. माजी गृहमंत्री स्व आर आर पाटील यांनी योजना ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे राबविली होती. शासनाकडुन गेली पाच वर्षात कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तरी विद्यमान सरकारने तर याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा उपळाई बुद्रूक (ता. माढा येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रा. मल्लिकार्जुन झाडबुके यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT