newase
newase 
पश्चिम महाराष्ट्र

नेवासे तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर

सुनील गर्जे

नेवासे : तालुक्यातील सातपैकी तीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पाणी असूनही थकीत वीजबिला अभावी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षामुळे वर्षं-तीन वर्षांपासून बंद आहेत तर उर्वरित पाणी योजनाच्या गावातही नियोजनअभावी नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्याने लागत असल्याने कोट्यावधींची उड्डाणे होवूनही तालुक्यातील अनेक गावांची घागर उतानीच आहे. दरम्यान पाण्यासाठी महिलांच्या डोक्यावरचे हांडे आजही उतरला नसल्याचे भीषण वास्तव तालुक्यात आहे. 

तालुक्यात १५० कोटी ०७ लाख रुपये खर्चाच्या एकूण सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पैकी  गळनिंब-शिरसगाव, चांदे-शिंगवेतुकाई, घोगरगाव या तीन योजना पाणी असूनही १ कोटी ९३ लाख थकीत विजबिला अभावी गेल्या एक-तीन वर्षांपासून बंद आहेत. ग्रामस्थांनी पाण्यासाठीच्या उपोषण दरम्यान आमदार मुरकुटे, महसूल-वीज वितरण अधिकार्यांच्या उपस्थित टप्पे पाडून वीजबाकी भरण्याची तयारी दाखवत उपोषण स्थगित करण्यासाठीची लोकप्रतिनिधी व अधिकार्यांची मध्यस्थी फक्त 'फोटोसेशन' पूर्तीच ठरली. त्यांच्यामुळेच त्रेचाळीसगावांवर पाणी संकट आहे. पाणी व इतर पाणी योजनेचा लाभ मिळत नसल्याने अनेक गावांनी आम्हाला योजनांतून मुक्त करा असे ठराव संबंधित विभागाला पाठविले. त्यामुळे या कोट्यावधीच्या योजना फक्त ठेकेदारांना कुराण ठरत आहेत.

दरम्यान भेंडे-कुकाणे, सोनई-करजगाव, प्रवरासंगम, हिंगोणी-कांगोणी या पाणी योजनांतर्गत येणार्या गावांनाही दोन-चार दिवसाआड पाणी येत असल्याने कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. घोगरगाव योजनेचे विद्युतीकरण व विद्युतपंप पूर्णपने निकामे झाले आहेत. सोनई-कारजगाव योजनेंतर्गत सुमारे 30-35 वाड्या-वस्त्या अद्यापही लाभापासून वंचितच आहेत.

नेवासे तालुका प्रादेशिक योजनांचा आढावा
योजना            एकूण गावे      खर्च    
*प्रवरासंगम...............................03.................2.08 कोटी. 
*भेंडे-कुकाणे..............................06.................28.00 कोटी.
*सोनई-करजगाव.......................18.................75.00 कोटी  
*हिंगोणी-कांगोणी.......................03.................80.00 लाख. 
*गळनिंब-शिरसगाव (बंद)............26.................16.78 कोटी.  
*चांदे-शिंगवेतुकाई (बंद)...............06.................18.45 कोटी.  
*घोगरगाव (बंद)........................11.................06.96 कोटी.  

पाणी योजना दृष्टिक्षेपातून
एकूण योजना : 7  *एकूण खर्च : 150.07 कोटी.  *एकूण गावे : 73.  *बंद योजना : 3. *थकीत विजबिल : 1.93 कोटी

घोषणाबाज लोकप्रतिनिधी : सुरेखा पवार
“ग्रामस्थांनी तीनदा आंदोलन केले. दरम्यान घोषणाबाज लोकप्रतिनिधींनी आश्वासन देवून उपोषण सोडले. मात्र नंतर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. बाराही महीने आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे शिंगवेतुकाई येथील ग्रामस्था सुरेखा पवार यांनी सांगितले. 

कृती शून्य लोकप्रतिनिधी : शंकरराव गडाख 
"लोकप्रतिनिधी तालुक्यात फक्त घोषणांचाच पाऊस व पाणी पाडत आहेत. प्रत्येक्षात मात्र कृती शून्य आहे. तालुक्यात नियोजना अभावी अनेक गावांना पाणीप्रश्न भेडसावत आहे. बंद योजना सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरु असा इशारा माजी आमदार शंकाराव गडाख यांनी सांगितले.  

तालुक्यात ५० कोटीच्या ४५ स्वतंत्र पाणी योजना : मुरकुटे
तालुक्यात पाणी टंचाई युक्त ४५ गावांसाठी ५० कोटी रुपयांची ४५ स्वतंत्र पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे आगामीकाळात तालुक्यात कोणत्याही गावांना पाणीटंचाई भासणार असल्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT