पश्चिम महाराष्ट्र

'वाहन नामा' उलगडणार 'एसटी'चा इतिहास

विविध टप्प्यावर बदलेला एसटीचा लूक लोकांची उत्कंठा वाढवणारा आहे

शामराव गावडे

नवेखेड : एसटी च्या इतिहासाची माहिती नव्या पिढीला माहिती व्हावी, आत्मीयता वाढावी या उद्देशाने गतकाळातील विविध प्रकारच्या बसची माहिती देणारा 'वाहन नामा' हा उपक्रम एसटीने सुरू केला आहे. याला प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धीही देण्यात आली आहे. विविध टप्प्यावर बदलेला एसटीचा लूक लोकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

१९४८ ते २०२१ या ७३ वर्षांमध्ये एसटीने बदललेली रूपे याचा वेध घेण्यात आला आहे. एक जून १९४८ ला पहिली बस कशी होती. पहिली आराम बस कोणत्या मार्गावर धावली, वातानुकूलित बस कोठे बांधण्यात आली याची इत्थंभूत माहिती या 'वाहन नामा' मध्ये देण्यात आली आहे. १ जून १९४८ ला तिच्या निळ्या चंदेरी रंगाची तीस आसनी बस नगर पुणे मार्गावर पहिल्यांदा धावली. भाडे होते अवघे ५० पैसे. पहिल्यांदा एसटीच्या कार्यशाळेत लेलँड कंपनीचा चासिसवर बस बांधणी करण्यात आली. मुंबईच्या सांताक्रूझ येथील कार्यशाळेत बस बांधण्यात आली.

पहिली आरामबस १९५० ला वापरात आली. दोन बाय दोन आसने असणारी ही बस लोकप्रिय ठरली. १९५३ ला पहिल्यांदा मालवाहतूक बस धावली. भूकंप महापूर या आपत्ती काळात एसटीने मोठे योगदान दिले. १९६० ला पहिली लाल पिवळी बस पुढे आली. यावेळी गंज रोधक अॅल्युमनिअम पत्राच्या वापर करण्यात आला. हा रंग सर्वत्र लोकप्रिय ठरला. 1962 ला भारत, चीन व 1965 ला भारत, पाकिस्तान या युद्धकाळात एकूण ८० बसेस तयार करुण संरक्षण खात्याकडे देण्यात आल्या.

१९६४ -६५ ला आराम बस वातानुकूलित बस बांधण्यात आल्या. पुढे हिरकणी, यशवंती, शिवनेरी, परिवर्तन, विठाई, शिवशाही आशाही बसेस तयार करण्यात आल्या व त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. पुढे प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या एसटी प्रत्येक महिन्याला वेगळा विषय घेऊन सोशल मीडिया व इतर माध्यमाद्वारे प्रवाशांशी संवाद साधणारा आहे. एसटीमध्ये झालेला सकारात्मक बदल त्याला सचित्र रुप देऊन तो मांडण्यात येणार आहे एसटीच्या या उपक्रमाचे सर्वत्र चर्चा आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT