पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास बंदी

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या आवारात येताना भाविकांनी भारतीय पोशाखच परिधान करून यावे. तसेच पुरुष आणि महिलांनी शर्ट, पॅंट परिधान करून येण्यास मात्र परवानगी दिली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत याबाबतचा ठराव झाला, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नवरात्र उत्सवाची माहिती देण्यासाठी मंदिराच्या गरुड मंडपात पत्रकार परिषद झाली. 

महेश जाधव म्हणाले, ‘‘मंदिरामध्ये देशभरातून भाविक येतात. काही वर्षांत परदेशी पर्यटकांचे प्रमाणही वाढले आहे. परराज्यातून येणारे भाविक देवीचे दर्शन आणि पर्यटन या उद्देशाने आलेले असतात. अनेक वेळा महिला आणि पुरुष तोकडे कपडे घालून मंदिरात येतात.

याबाबत काही भाविकांनी देवस्थान समितीकडे तक्रार केली व भाविकांना भारतीय पोशाखाची सक्ती करावी असे सुचवले. याबाबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. दक्षिणेतील बहुतांशी मंदिरात भारतीय पोशाख अनिवार्य केला आहे. तोकड्या कपड्यात येणाऱ्या भाविकांमुळे मंदिराच्या पावित्र्याला बाधा येते. त्यामुळे सर्वच सदस्यांनी भारतीय पोशाखाच्या सक्तीबाबात सहमती दर्शवली. त्यामुळे येथून पुढे केवळ भारतीय पोशाखातील भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तोकड्या कपड्यात येणाऱ्या महिला व पुरुषांना मंदिर आवारात प्रवेश दिला जाणार नाही.

श्री. जाधव म्हणाले, नवरात्रोत्सवापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सुरुवातीला तोकड्या कपड्यात येणाऱ्या भाविकांना देवस्थान समितीच्या निर्णयाची कल्पना दिली जाईल. सुरुवातीला काही दिवस सूचना दिल्या जातील. नंतर मात्र या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. ज्या भाविकांना मंदिरात येण्यासाठी भारतीय पोशाख परिधान करायचा आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली व अन्य व्यवस्था करण्यात येईल. भारतीय पोशाखात शर्ट आणि पॅंट यांना परवानगी दिली असून जीन्स कपडेही परिधान करता येणार आहे. पण तोकडे कपडे परिधान करून मंदिरात येता येणार नाही. 

या वेळी देवस्थान समितीच्या खजानीस वैशाली क्षीरसागर, सदस्य संगीता खाडे, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, अभियंता सुदेश देशपांडे उपस्थित होते. 

या कपड्यांना परवानगी
शर्ट, पॅंट, टी शर्ट यासह सर्व प्रकारचे पोशाख परिधान करून भाविक मंदिरात येऊ शकतात. संपूर्ण कपड्यातील भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. 

या कपड्यांना प्रवेश निषिद्ध 
हाफ पॅंट, थ्री फोर्थ, बिन बाह्याचे शर्ट व टॉप्स, मिनी स्कर्ट हा पोशाख परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT