पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर एक्सप्रेस सुपरफास्ट तर महालक्ष्मी, सह्याद्रीच्या वेळेत बदल

सकाळ वृत्तसेवा

मिरज - मध्य रेल्वेने अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात आजपासून बदल जाहीर केला. सोलापूर - कोल्हापूर एक्स्प्रेस (क्रमांक 11051/11052) आता सुपरफास्ट म्हणून धावेल. तसेच कोल्हापुरातून सुटणाऱ्या कोयना, महालक्ष्मी, सह्याद्री या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

सोलापूर एक्सप्रेसचा नवा क्रमांक 22133/22134 असा असेल. एक्सप्रेसचे रुपांतर सुपरफास्टमध्ये झाल्याने तिकिटदरही किंचीत वाढणार आहे. यापुर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांना प्रवासादरम्यान सुपरफास्टचे अतिरिक्त शुल्क तिकीट तपासणीसाकडे द्यावे लागेल.

हुबळी - लोकमान्य टिळक टर्मीनस ( कुर्ला ) ही गाडी 5 ऑक्टोबरपासून रद्द केली आहे. 29 एक्स्प्रेस गाड्यांचा वेगही वाढणार आहे. सोलापूर-कोल्हापूर प्रवासात 65 मिनिटे तर कोल्हापूर-सोलापूर प्रवासात 120 मिनिटांचा वेळ वाचेल. ही गाडी मध्यरात्री सव्वाएक वाजता मिरजेतून निघते, नव्य़ा वेळापत्रकानुसार अर्धा तास अगोदर म्हणजे 12.40 वाजताच निघेल. सोलापुरातून पहाटे 4 वाजता मिरजेत येते व कोल्हापुरकडे निघते. आता ती पहाटे 4.25 वाजता मिरजेतून निघेल. 

कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी रेल्वेच्या वेळेत बदल

कोल्हापूर - मुंबई कोयना एक्स्प्रेस (क्रमांक 11030 ) कोल्हापुरातून सकाळी 7.55 ऐवजी 8.05 वाजता सुटेल. कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस ( क्रमांक 17412 ) सकाळी 7.25 ऐवजी 7.35 वाजता मुंबईत सीएसएमटीला पोहचणार आहे. कोल्हापूर - मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस (क्रमांक 11024 ) सकाळी 11.50 ऐवजी दुपारी 12.05 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

सोलापूर - कोल्हापूर एक्स्प्रेस रात्री 11.35 ऐवजी 11.50 वाजता सोलापुरातून सुटेल. कोल्हापुरात सकाळी 6.20 ऐवजी 5.30 वाजता पोहोचेल. कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस (क्रमांक 22134) कोल्हापुरातून रात्री 11.55 वाजता सुटते़, त्याऐवजी आता 11.30 वाजता सुटेल. सोलापुरात सकाळी 7.35 ऐवजी पहाटे 5.10 वाजता पोहोचेल. बिदर-कोल्हापूर एक्स्प्रेस ( क्रमांक 11415 ) कोल्हापुरात रात्री 12.35 ऐवजी 12.25 वाजता पोहोचेल.
कोल्हापूर-बीदर एक्स्प्रेस ( क्रमांक 11416 ) कोल्हापुरातून रात्री 11.25 ऐवजी 11.55 वाजता सुटेल. पुद्दुचेरी-दादर एक्स्प्रेस ( क्रमांक 11006 ) रात्री 8.47 वाजता मिरजेतून निघते़ त्याऐवजी 8.50 वाजता निघेल. 

गाडी क्रमांक 11022 ही तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस मिरजेतून रात्री 8.47 ऐवजी 8.50 वाजता रवाना होईल. म्हैसूर-दादर शरावती एक्स्प्रेस ( ्रमांक 11036 ) रात्री 8.47 ऐवजी 8.50 वाजता मिरजेतून निघेल. 

कुर्डुवाडी पॅसेंजर 6.25 वाजता
पहाटे 6 वाजता मिरजेतून सुटणारी कुर्डुवाडी पॅसेंजर आता 6.25 वाजता सुटेल. कोल्हापूर-पुणे पॅसेंजरने सकाळी सहा वाजता मोठ्या संख्येने प्रवाशी मिरजेत येतात व पंढरपूर-कुर्डुवाडीला जातात. त्यांच्या सोयीसाठी कुर्डुवाडी पॅसेंजर 25 मिनिटे उशिरा निघेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT