पश्चिम महाराष्ट्र

'तौक्ते' वादळात 19 तास समुद्रात लढा, सांगलीच्या निखिलची संघर्षगाथा

विजय लोहार

एकूणच निखिलच्या आयुष्यात मृत्यू प्रत्येक क्षणाला उभा होता, परंतु जिद्दीच्या जोरावर त्याने 'तौक्ते' वादळाला हरवलं हे नक्की.

नेर्ले (सांगली) : अथांग अरबी समुद्र... तौक्ते वादळ(Taukte cyclone). संपूर्ण भारताच्या पश्चिम भागाला तडाखा देत ताशी १८० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने अनेकांचा संसार व आयुष्य आपल्या कवेत घेतला. बरसणारा पाऊस आणि क्षणा क्षणाला उंचच्या उंच डोंगराएवढ्या उसळणाऱ्या समुद्राच्या फेसाळ लाटा. विजेचा प्रचंड कडकडाट. काळोखालाही भीती वाटावी एवढा गडद अंधार. जीवन आणि मरणाच्या लाटांवर स्वार होऊन तौक्ते वादळात (Taukte cyclone) भरकटलेल्या जहाजातून सांगली (Sangli) जिल्ह्यातील निखिल सुपनेकर (Nikhil supnekar) याने समुद्राला हरवत तब्बल १९ तास पोहत आपल्या आयुष्याची दोरी जिद्दीच्या जोरावर बळकट केली. हे सगळं तो पाहत त्याने मृत्यूवर मात केली. अंगावर काटे आणणारा प्रसंग सांगताना निखिल आजही कल्पना करताना स्वतःला विसरून जातो. (nikhil supnekar from kalamwadi saved his life from the taukte cyclone)

निखिल कैलास सुपनेकर (वय २५) रा. काळमवाडी ता.वाळवा जि. सांगली. घरची परिस्थिती बेताची. वडील शेती व मेंढपाळचा व्यवसाय करतात. तौक्ते वादळात जलसमाधी झालेल्या बार्ज पी.३०५ या जहाजावर वेल्डर म्हणून काम करीत होता. जहाजावर त्याच्या सोबत जवळपास ३०० कर्मचारी कार्यरत होते. मुंबईपासून जवळपास १०० किमी अरबी समुद्रात हिराफिल्ड या पॉईंटवर हे बार्ज पी. ३०५ जहाज समुद्रातून ऑईल काढत होते. (ता. १६) मे च्या मध्यरात्री अचानक तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रूप धारण करीत जहाजामध्ये वारा पावसासह समुद्रातील पाण्याने प्रवेश केला.

संपूर्ण रात्र भीतीच्या छायेखाली काढली. १७ मे रोजी सकाळी जहाज बुडण्यास सुरुवात झाली. यावेळी जहाजांवर जवळपास ३०० कर्मचारी होते. तौक्ते वादळाच्या भोवऱ्यात जहाज सापडले. प्रचंड पाऊस, आकाशात विजांचा मरणासन्न थयथयाट. त्यावेऴी कर्मचारी सैरभैर झाले. दिवसा देखील काळोख पसरला होता. काही 100 च्या वर कर्मचाऱ्यांनी जीवाच्या आकांताने समुद्रात उड्या मारल्या. बाकीचे कर्मचारी पर्याय नसल्याने त्या जहाजातच थांबले. हे जहाज १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता समद्रात पूर्णपणे बुडाले. तत्पूर्वी निखिलने ही सायंकाळी ४.३० च्या दरम्यान समुद्रात उडी मारली होती. अंगावर सेफ्टी लाईफ जॅकेट होते.

यावेळी पाऊस, जोरदार वारा, कडकडणाऱ्या विजा, अशा भयावह परिस्थितीमध्ये निखिलच्या जीवन-मरणाची लढाई सुरू झाली. तो तब्बल १९ तास समुद्रात पोहत होता. यावेळी क्षणोक्षणी लाटा यायच्या, नाका-तोंडात खारट पाणी जायचं. जिवाच्या आकांताने आणि आई वडिलांची ओढ व जगण्याचा त्याचा संघर्ष सुरू झाला होता. १८ मे च्या दुपारी १ च्या दरम्यान इंडियन नेव्ही व एअरफोर्स ने जॅकेट मधील लोकेशन चिपच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या साहयाने निखिलला बाहेर काढले. निखीलच्या एका हाताला व डोक्याला दुखापत झाली. यावेळी त्यास तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २१ मे रोजी तो त्याच्या गावी सुखरूप पोहचला.

एकूणच निखिलच्या आयुष्यात मृत्यू प्रत्येक क्षणाला उभा होता, परंतु जिद्दीच्या जोरावर त्याने 'तौक्ते' वादळाला हरवलं हे नक्की. काळमवाडी करांनी निखिलच्या धाडसाचे तोंड भरून कौतुक केले. (nikhil supnekar from kalamwadi saved his life from the taukte cyclone)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT