Nipani confesses to stealing mobile phone from Gajbarwadi thief nipani marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

दोन घटनांचा झाला उलगडा: गजबरवाडीच्या चोरट्यांनी दिली कबुली

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या गजबरवाडीतील सराईत मोबाईल चोरट्यांकडून निपाणीतील दोन घटनांचा उलगडा झाला आहे. शहर व ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही घटनांचा तपास चालवला आहे. सुमीत महादेव निकम (वय २५) असे चोरट्याचे नाव आहे. कोल्हापूर पोलिसांनी निकम याच्याकडून २ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे १४ मोबाईल ३ एप्रिल रोजी जप्त करून त्याला अटक केली आहे.


सराईत चोरटा सुमीत निकम याने कोल्हापूर पोलिसांना आपण कोल्हापूर शहर व परिसरासह निपाणी, हुपरी, कणेरीवाडी, कागल, इचलकरंजी, गडहिंग्लज, संकेश्वर परिसरातून मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. यामध्ये निपाणी येथील अनुराधा रवींद्र बोंगार्डे (रा. श्रीनगर, निपाणी) यांचा प्रतिभानगर येथून १३ जानेवारी तर सौंदलगा येथील अर्चना तानाजी भेंडुगळे यांचा १६ फेब्रुवारी रोजी सौंदलगा-कुर्ली पाणंद रस्त्यावरून चालत जाताना हातातील मोबाइल हिसडा मारून पोबारा केला होता. पोलिस तपासात ही माहिती उघड झाल्याने निपाणी शहर व ग्रामीण पोलिसांनी संबंधित दोन्ही महिलांकडून तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी, राष्ट्रवादीच्या पक्षचिन्ह अन् नावाचाही होणार फैसला

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र–कर्नाटक सीमावादावर तब्बल आठ वर्षांनंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Kolhapur Politics : कल्लाप्पाण्णा–प्रकाश–राहुलनंतर सानिका; आवाडे घराण्याची नवी राजकीय खेळी, सानिका आवाडे जिल्हा परिषद लढवणार

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी! ई केवायसी न झाल्याने हफ्ता न मिळाला नाही? राज्य सरकारच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना

आजचे राशिभविष्य - 21 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT