पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर विधानसभा नगराध्यक्ष निशिकांत पाटील लढवणार

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर - काहीही झाले तरी इस्लामपूर विधानसभा निवडणूक लढविणारच आहे, असे आज  सांगत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अनेक दिवस सुरू असलेल्या वावड्यांना पूर्णविराम दिला. पै-पाहुण्यांचे राजकारण थांबविण्यासाठी आणि सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मैदानात उतरत असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले,‘‘गेल्या ३० वर्षांत  इस्लामपूर मतदारसंघात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. जयंत पाटील यांच्या कुटनीती, गुंडगिरी, वाळूमाफिया, भूमाफिया आणि पै-पै पाहुण्यांच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. विविध योजनांचा लाभ देण्यासाठी २८४ बूथवर कार्यकर्ते पोहोचले आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुमारे २१ हजार ८०० हून अधिक जणांपर्यंत पोहोचला आहे.’’

ते म्हणाले, ‘‘गेली ३० वर्षे नेतृत्व करणाऱ्या जयंत पाटील यांना नोकरी मेळावा  घ्यावा लागणे, दुर्दैवी आहे. युवकांच्या हाताला काम देणारे एकही नवे युनिट ते उभारू शकले नाहीत. गेल्या १५ वर्षांत शहरातील भुयारी गटरचा प्रश्‍न सोडवता आला नाही. शहरातील २९०० कुटुंबांना स्वतःचे घर नाही. तालुक्‍यातील १० हजार जणांकडे सिलिंडर गॅस नाही. ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचे रस्ते ते करू शकले नाहीत. राजारामबापू यांच्यानंतर त्यांना संस्था उभारता आली नाही; उलट इतरांच्या संस्था उभारू नयेत, यासाठी प्रयत्न केले. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण केले, त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यांना एफआरपीसाठी आशाळभूतपणे वाट पाहावी लागत आहे. राजकारण टिकविण्यासाठी त्यांनी गावांगावात गट तयार करून त्यांच्यात भांडणे लावली.’’

ते म्हणाले, ‘‘मतदारसंघात युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांच्यात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे शहरातील स्वाभिमानी नागरिकांनी मला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. गेल्या दोन वर्षांत लोकहिताचे अनेक निर्णय घेत दिलेली आश्‍वासने पूर्ण केली. तालुक्‍याला असणारा क्रांतीचा वारसा जपून मतदार यावेळी क्रांती घडवतील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT