No confidence motion against Deputy Panch Dagdu Jugdar for violating rules at Atpadi political marathi news
No confidence motion against Deputy Panch Dagdu Jugdar for violating rules at Atpadi political marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

नियमाचे उल्लंघण करून अविश्वास मंजूर केल्यास जशास तसे उत्तर देऊ : महादेव जुगदर

सदाशिव पुकळे

झरे (सांगली) : जांभुळणी आटपाडी येथे नियमाचे उल्लंघन करून उपसरपंच दगडू जुगदर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याचे षडयंत्र अखेर अपयशी ठरले. जर नियमाचे उल्लंघन करून अविश्वास ठराव दाखल झाला, किंवा मंजूर झाला, तर त्याच नियमाच्या भाषेमध्ये जशास तसे उत्तर देऊ असे माजी सरपंच महादेव जुगदर  यावेळी सकाळशी  बोलताना म्हणाले.
 अविश्वास ठराव मंजूर होत नाही म्हटल्यावर ग्रामसेवक यांच्यावर प्रोसेडींग चोरल्याचा आरोप करण्यात आला, ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा आले होते.

या घटनेने उडाला गोंधळ

ग्रामपंचायत मध्ये 7 सदस्य व सरपंच असे 8 जण आहेत. सदस्या पैकी 1 सदस्य मासिक सभेला सतत गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. तो अविश्वास ठराव मंजूर होऊन त्यांचे सदस्य पद रद्द झाले होते. म्हणजे एकूण 6 सदस्य सध्या कार्यरत आहेत.सध्याच्या संख्येनुसार अविश्वास ठराव दाखल करायचा म्हटलं तर 3 चतुर्थांश पेक्षा जास्त संख्याबळ असेल, तर ठराव मंजूर होतो. त्याप्रमाणे  5 पेक्षा जास्त सदस्य संख्या असेल तरच अविश्वासाचा ठराव मंजूर होतो.
एकूण सदस्य संख्या 7 त्यापैकी 1  जनाचे सदस्य पद रद्द झाले होते. सध्या संख्याबळ राहिले 6 त्यापैकी 2 गैरहजर राहिले,तर मीटिंगला 4 सदस्य हजर होते . 4 सदस्य व सरपंच असे संख्याबळ 5 झाले होते.अविश्वास टाकण्यासाठी 5 पेक्षा जास्त संख्या असेल तरच अविश्वास मंजूर होतो.परंतु नियमाचे उल्लंघन करून व ग्रामसेवक यांच्यावर  दबाव टाकून ठराव मंजूर करून घेण्याचे षडयंत्र सरपंच पती शिवराम मासाळ करीत असल्याची तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक यांनी केली आहे.

गावात घटनेची खुमासदार चर्चा 

त्यामुळे ग्रामपंचायतीला काही काळ टाळे ठोकण्यात आले.  ठराव मंजूर होत नाही म्हटल्यावर ग्रामसेवक यांच्यावर प्रोसिडिंग चोरीचा आरोप करण्यात आला. ग्रामसेवक यांनी झालेल्या मिटिंगच्या झेरॉक्स काढण्यासाठी प्रोसिडिंग पंचायत समिती मध्ये नेले होते. झेरॉक्स काढून झाल्यानंतर तेच प्रोसिडिंग आणून ग्रामपंचायत मध्ये  कपाटामध्ये  ठेवण्यात आले आहे.

 माझे एेकत नाही म्हणून  ग्रामसेवकला दमदाटी करण्याचा प्रयत्न करून, बदनाम करण्यासाठी सरपंच पती शिवराम मासाळ यांचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामस्थ मात्र या घटनेची खुमासदार चर्चा करीत आहेत.तसेच ग्रामपंचायत च्या कारभारामध्ये सरपंच पती शिवराम मासाळ यांची सतत लुडबूड असते .अनेक ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी माजी सरपंच महादेव जुगदर यांनी केली आहे.

नियमाचे उल्लघण करून अविश्वास ठराव मंजूर केल्यास नियमा च्या भाषेतच उत्तर देणार, महिला सरपंच असताना पतीदेवणी लुडबुड थाबवावी. 
महादेव जुगदर - माजी सरपंच जांभुळणी
 

 3 चतुर्थांश पेक्षा जास्त संख्याबळ असेल तर अविश्वास मंजूर होतो, प्रोसेडींग चोरीचा आरोप खोटा आहे. सर्व दप्तर ग्रामपंचायत मध्ये सुरक्षित आहे.
- जयंत खंडागळे ग्रामसेवक

 महिला सरपंच असताना प्रत्येक कामात त्यांचे पती लुडबुड करीत असतात,महिला सरपंचच्या अधिकाराची पायमल्ली होते ती थांबवावी 
- शरद ढोकळे - मनसे तालुका उपाध्यक्ष

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT