The office will make it available to the farmers saat bara online 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांना दिलासा... 'या' कामासाठी सात बारा घेऊन फिरायची गरज पडणार नाही...

सकाळ वृत्तसेवा

सांगली - राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा व खाते उतारा ऑनलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. ते लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बॅंकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही. ज्या कार्यालयात शेतकऱ्यांचे काम आहे, ते कार्यालय संबंधित शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून घेईल. तसा निर्णय लवकरच निघेल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले,‘‘महापूर, अवकाळी, अतिवृष्टीने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मदत व नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. त्यात काही अडचणी होत्या. त्या सोडवण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित क्षेत्र व शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम प्रयत्नशील आहेत. गाववर आढावा घेऊन मदतीपासून 
कोणी वंचित राहू नये यासाठी १८ फेब्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालात बैठक घेतील.’’

ते म्हणाले,‘‘राज्यातील महसूल विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. कामाचा निपटारा होत नाही. महसूलमधील रिक्त जागा भरण्याबाबत लवकरच निर्णय घेऊन भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.’’

ते म्हणाले,‘‘काँग्रेसने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमले आहेत. जिल्ह्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाला विविध समित्या कराव्या लागतात. संपर्क मंत्री, जिल्हा समित्या व पालकमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील आणि जिल्ह्यातील समस्या सोडवण्यास मदत होईल. संपर्कमंत्री पदामुळे पक्ष वाढीसाठीही मोठी मदत होणार आहे.’’ यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

सांगली तालुक्‍यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय 

सांगली येथे स्वतंत्र तालुका व्हावा, अशी अनेक वर्षांची मागणी आहे; परंतु येथे तालुकानिर्मितीसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो. सांगली तालुकानिर्मितीसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊ, असे महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: किशोरी पेडणेकर ते नील सोमय्या... बीएमसी निवडणुकीत उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ, शपथपत्रांतून धक्कादायक आकडे उघड

CM Fadnavis: नॅशनल क्रश घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत; देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात 'टॉक शो'

Latest Maharashtra News Updates Live: मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला मिळाली गती - मुरलीधर मोहोळ

Crime: नवऱ्याचे घनदाट केस आवडायचे; पत्नीने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला अन् सगळे केसच हाती आले, नंतर... जे घडलं ते भयंकर

Raigad News : घातक कचऱ्यावरून खळबळ; पालीत वैद्यकीय कचरा व्यवस्थापनावर कडक निर्बंध!

SCROLL FOR NEXT