पश्चिम महाराष्ट्र

नक्षलवादीविरोधात लढणाऱ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांवर कोरोनाचा हल्ला

शामराव गावडे

नवेखेड : नक्षलवाद्यांशी कडवी (stark-raving) झुंज देणाऱ्या बोरगाव (ता. वाळवा) येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित रमेश फारणे यांच्या कुटुंबियांना मात्र कोरोनाने हरविले. अवघ्या सतरा दिवसात त्यांचे आई, वडील व आजोबा कोरोनाने मृत्यूमुखी (covid-19) पडले. रोहित यांनी विद्यार्थी दशेत असल्यापासून कुस्ती करत शैक्षणिक करिअर (educationl career) घडविले. 'जिंकलो तर तिरंगा फडकावून, (hosting indian flag) शहीद झालो तर तिरंग्यातून मागे येणार' या जिद्दीने ते गडचिरोलीत पोलिस उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले. त्यांनी नक्षलवाद्यांचे आव्हान स्वीकारले. युद्धसदृश परिस्थितीत नक्षलवाद्यांना कंठस्नानही घातले.

नक्षलवादी विरोधी अभियान पथकात तीन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना डिसेंबर 2020 मध्ये विशेष सेवा पदक मिळाले. या शौर्याबद्दल त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. एक मे 2021 च्या पोलिस महासंचालक पदकाचे ते मानकरी ठरले. मात्र या सगळ्या लढाई जिंकणाऱ्या ध्येयवादी युवकाच्या कुटुंबाला मात्र कोरोनाने हिरावून घेतले आहे. त्यांच्या कुटुंबावर कोरोनाने जबरदस्त हल्ला केला की, डोळ्यादेखत घरातील आई, वडील व आजोबांचा मृत्यू झाला. घरी वृद्ध आजी एकट्या असल्याने बोरगावसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

रोहितचे आजोबा व जुन्या पिढीतील वारकरी (हभप) रघुनाथ बाबुराव फारणे यांनी कष्टाच्या जोरावर प्रगती केली. बालपनापणापासून त्यांना भजन, गायन, वादनाची आवड होती. हे विकसित करत त्यांनी शास्त्रीय संगीत, कला व वाद्यांचे शिक्षण घेतले आणि गायक बनले. त्यांनी संगीत व सांप्रदायिक भजनात गायन करुन नावलौकिक मिळविला. चरितार्थासाठी त्यांनी अनेक कामे केली. ब्रह्मांनंद महाराज मठ व गणपती मळ्यातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या संयोजनात ते अग्रभागी असायचे.

त्यांचे सुपुत्र रमेश फारणे यांनी शिक्षण पूर्ण करुन राजारामबापू सहकारी कारखान्यात स्लीप बॉय काम केले. येत्या 30 जूनला ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार होते. सेवा निवृत्तीनंतर तणावमुक्त, निवांत जीवन जगून पत्नी व आई वडिलांसोबत आनंदात रहायचे असे त्यांचे स्वप्न कदाचित नियतीला मान्य नव्हते. २२ एप्रिलला वडिलांचे कोरोनाने निधन झाले. दुसऱ्याच दिवशी आई लक्ष्मी फारणे यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजे ८ मेला रमेश रघुनाथ फारणे यांचे निधन झाले. कोरोनाने कुटुंबातील आधार उन्मळून पडला.

रोहितने पोलिस ते एपीआय पदापर्यंतचा प्रवास जिद्दीने पूर्ण केला. त्यांच्या पत्नी वसुंधरा या समाज कल्याण विभाग पुणे येथे कार्यरत आहेत. प्रदीर्घ कष्टानंतर या कुटुंबाला लाभलेले सुखाचे दिवस कोरोनाने हिरावून घतेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT