One Dead in Acident at Khanapur Belgaum.gif
One Dead in Acident at Khanapur Belgaum.gif 
पश्चिम महाराष्ट्र

..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला 

सकाळ वृत्तसेवा

खानापूर  (बेळगाव) : नातेवाईकांचा मृतदेह वाहनात घालून मागून दुचाकीवरून जाताना म्हैस दुचाकीसमोर आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 4) सायंकाळी घडली. सुधीर कृष्णा देसाई (वय 31) हा जागीच ठार झाला, तर सागर दौलत देसाई (वय 29) हा या अपघातात जखमी झाला. दुचाकीला धडकलेली म्हैसही गंभीर जखमी झाली. 

पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, सुधीर यांच्या नातेवाईकाचे आजाराने खानापुरात निधन झाले होते. त्यांचा मृतदेह वाहनात घालून सुधीर आणि सागर दुचाकीवरून त्या वाहनामागून जात होते. माचीगड-कापोली रस्त्यावर हालसालनजीक अचानक म्हैस दुचाकीसमोर आली. दुचाकीची जोराची धडक बसून म्हशीचे शिंग सुधीरच्या पोटात घुसले. अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. सागर यालाही जबर मार बसला. यावेळी कापोलीला अंत्यसंस्कारासाठी निघालेले माजी आमदार अरविंद पाटील यांना मृतदेह आणि जखमीला खानापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. सागरवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 

घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येथील सरकारी रुग्णालयात शवचिकित्सा करून आज रविवारी सकाळी मृतददेह नातेवाईकांकडे सोपविला. त्याच्या पश्‍चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तो अविवाहित होता. सुधीर हा उद्यमबागला कामाला होता. शनिवारी निवृत्त शिक्षक व जवान सयाजी गुणवंत देसाई यांचे निधन झाले होते, त्यातच सुधीर अपघातात ठार झाल्याने कापोलीवर शोककळा पसरली आहे. 

हे पण वाचा -सावधान ! जोतिबाला जाताय...

असाही दुर्दैवी योगायोग 
नातेवाईक निवर्तल्याची माहिती मिळाल्यामुळे सुधीर कामावरून लवकर परतला होता. नातेवाईकांचा मृतदेह गावी कापोलीला न्यायचा होता. म्हणून त्याने खानापुरात मृतदेह शववाहिकेत घालण्यासाठी मदत केली आणि वाहनामागून तो जात असतानाच काळ बनून आलेल्या म्हशीला दुचाकीची धडक बसली. मृतदेह सोडण्यासाठी गेलेल्या त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह खानापूरला शवचिकित्सेसाठी आणावा लागला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT