pn patil and mahadevrao mahadik photo viral on social media.gif 
पश्चिम महाराष्ट्र

"गोकुळा'त "ही दोस्ती तुटायची नाय!'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  ः आमदार पी.एन.पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक एकत्रित असलेले छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे "ये दोस्ती हम नही तोडेंग' या गाण्यावर हे छायाचित्राचा व्हिडीओ केला आहे. "गोकूळ'च्या निवडणुकीत ही दोस्ती तुटणार नाही, असे त्याचे संदर्भ पुढे येत आहेत.
महादेवराव महाडिक हे आमदार पाटील यांच्या खांद्यावर हात टाकून काही तरी समजावत असल्याचे हे छायाचित्र आहे. जुने छायाचित्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काहींनी या मिक्‍सिंग व्हिडीओचे व्हॉटस्‌ ऍप "स्टेटस' सुद्धा ठेवले आहेत. गोकूळ (जिल्हा दूध संघ)ची निवडणूक येऊ घातली आहे. कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील हे आजपर्यंत गोकूळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सोबतच राहिले आहेत. तसेच इतर निवडणुकीत ते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्या सोबत असल्याचे दिसून येते.

हे पण वाचा -  गुड न्यूज...  `या` बॅंकेच्या लिलावास स्थगिती...

आमदार पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीत मंत्री पाटील यांच्यासहकार्य मिळाले आहे. यापूर्वी ते "गोकूळ'मध्ये महादेवराव महाडिक यांच्या सोबत होते. येत्या निवडणुकीत ते कोठे राहणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. राजकरणात कोण कोणाचे दोस्त नसतो आणि कोण कोणाचे शत्रू नसतो, असे म्हटले जाते. त्यामुळे जिल्हा बॅंक, गोकूळ आणि इतर स्थानिक संस्थांमध्ये कोण कोणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही.

हे पण वाचा - कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास थोरात का आहेत अनुत्सुक? 

मोटारीचे क्रमांकही
नेत्यांचे कट्टर समर्थक सोशल मीडियावरून अनेक मॅसेज व्हायरल करत असतात. त्यापैकीच हा एक मॅसेज आहे. तो मिक्‍सिंग केला आहे. महाडिक यांच्या मोटारींचा क्रमांक 7474 हाच असतो. तर आमदार पाटील यांच्या मोटारींचा क्रमांक 9292च असतो हे सुद्धा दाखविले आहे. आणि ही दोस्ती तुटायची नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

Pachod Accident : दुचाकींची समोरासमोर धडक; तिघे जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates Live : जळगावच्या एरंडोल येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात पडलेल्या खड्ड्यामुळे चालकांसह प्रवासी त्रस्त

OBC Quota Conflict: सक्षम खातील, दुर्बल बघत राहतील... मूळ ओबीसींच काय होणार? नेपाळसारखी परिस्थिती अन्...; आरक्षण अभ्यासकांचा इशारा

Digital Minister: मंत्रिपदाची जबाबदारी 'एआय'वर; टेंडर्सवर ठेवणार नजर, भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT