पश्चिम महाराष्ट्र

मठाधिपतीच्या खून्यास कठोर शिक्षा करावी

सकाळ वृत्तसेवा

फलटण (जि. सातारा) : पंढरपुरातील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठातील मठाधीपतिपदाच्या वादातून मठाचे विद्यमान मठाधिपती जयवंतबाबा पिसाळ यांचा तथाकथित मठाधिपती बाजीराव जगताप याने मठातच निर्घृण खून केल्याच्या घटनेचा निषेध करत संशयिताला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सकल संत सांप्रदायिक, अध्यात्मिक आणि सामाजिक विकास सेवा संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या नावे केली आहे. याबाबतचे निवेदन येथील प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती पोलिस उपअधीक्षक, तहसीलदारांनाही देण्यात आल्या. 

हे निवेदन दादासाहेब शेंडे, गणपतराव तथा बबनराव बाबूराव निकम, संस्थापक सचिव केशव महाराज जाधव, संस्थेचे अध्यक्ष छगन महाराज निंबाळकर, नंदकुमार कुमठेकर महाराज, प्रभाकर गावडे, सुरेश कोकीळ, जगन्नाथ काटकर, ऍड. अशोकराव जाधव, गोपीचंद जाधव, विजय लावंड वगैरेंनी प्रांताधिकारी श्री. जगताप यांना दिले. यावेळी निवेदनासह आमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवून न्याय देण्याची विनंती केली. पंढरपूर येथील या घटनेचा यावेळी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

हेही वाचा -  Video : मुंबईनंतर यांनाही हवी नाईट लाईफ

वारकरी संप्रदायाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आणि कलंक लावणारी ही घटना घडल्याचे नमूद करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वगैरे अनेक संतांनी आपल्या वाड्‌.मयातून व आचरणातून शांतीचा, समतेचा, विश्‍व बंधुत्वाचा, नि:स्पृहतेचा, सहनशीलतेचा मार्ग दाखवून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे. या पार्श्‍वभूमीवर संत विचारावर एक प्रकारे घाला घालणारी ही घटना असल्याने आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे यावेळी प्रांताधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट करण्यात आले. प्रांताधिकारी श्री. जगताप यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आपल्या भावना जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांमार्फत शासनस्तरावर पोचविण्याचे आश्‍वासन दिले. 

सकल संत सांप्रदायिक, अध्यात्मिक आणि सामाजिक विकास सेवा संस्था, फलटण, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र, संत ज्ञानेश्‍वर गोपालन व संशोधन संस्था पिंप्रद, भगवानमामा कऱ्हाडकर प्रतिष्ठान संचलित राष्ट्रबंधू राजीव दीक्षित गुरुकुल पिंप्रद आणि फलटण तालुक्‍यातील वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळींच्या वतीने हे निवेदन देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा - शिवसेनेचा हा मंत्री म्हणताे सध्या माझी तारेवरची कसरत सुरु आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT