Pass holders in Belgaum students got off the bus  
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात पासधारक विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरविले

कल्लेहोळ-बेळगाव बसमधील प्रकार : परिवहनबद्दल नाराजी

सतीश जाधव

बेळगाव : कल्लेहोळहून बेळगावला (Belgaum) येणाऱ्या दुपारच्या बसमधून भारतीय गुरुकल कॉलेजच्या (Indian Gurukul College) पासधारक विद्यार्थ्यांना खाली उतरविले. त्यात एक अपंग विद्यार्थी देखील होता. यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी दिसून आली. यानंतर कॉलेजच्या प्राचार्यानी (College Principal) त्या बसचा पाठलाग करून युनियन जिमखाना (Union Gymkhana) येथे त्या वाहकाला धारेवर धरले. यानंतर वाहकाने नमती भूमिका घेत पास बदलून घेण्याची कारणे दिली. वाहकाच्या या वागण्यामुळे प्रवाशांतून संतापाची लाट उसळली आहे. याकडे परिवहन अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

बेळगावहून उचगाव क्रॉस येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ये-जा असते. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी बसपास काढून घेतला आहे. गतवर्षी व यंदाही कोणत्याही अडचणींशिवाय हा बसपास चालला. मात्र, सोमवारी (ता. ३) विद्यार्थ्यांना बस पास चालत नाही, असे कारण देत बसमधून खाली उतरविण्यात आले. या विद्यार्थ्यानी प्राचार्य आनंद आपटेकर यांना या बद्दलची माहिती दिली. प्राचार्यानी बसचा पाठलाग करत बोगारवेस येथे त्या वाहकाला जाब विचारला. इतक्यात मागून येणाऱ्या बसमधून ते पासधारक विद्यार्थीही त्या ठिकाणी आले. वाहकाने टाळाटाळ करत बस पासमध्ये बदल करून घेण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर तुम्ही अपंग विद्यार्थ्याला का उतरविले असा प्रश्‍न केला असता मी त्यांना उतरण्यासाठी सांगितले नसल्याचे उत्तर वाहकाने दिले.

कल्लेहोळमधून दुपारी निघालेल्या के. ए. २२, एफ १५५४ या बसच्या वाहकाने त्या विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरविले होते.

वाहकाला मराठी येत होते, तरी देखील मराठीमध्ये बोलत असलेल्या विद्यार्थ्यांना व प्राचार्यांना कन्नडमध्ये बोलण्यास सांगितले. वाहकाच्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मधुरा हॉटेलजवळून भारतीय गुरुकुलकडे जाता येते. मात्र, परिवहनच्या बसेस कल्लेहोळ क्रॉसजवळ थांबविल्या जातात. यामुळे कॉलेजमधील कर्मचाऱ्यांना चालत पल्ला गाठावा लागतो. याकडेही परिवहनच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT