पश्चिम महाराष्ट्र

Lockdown : डॉक्‍टर... पेट्रोलसाठी औषधांची चिठ्ठी द्या..! 

अंकुश चव्हाण

कलेढोण (जि.सातारा)  : लॉकडाऊनच्या काळात दुचाकीत पेट्रोल टाकून हिंडण्यासाठी तरुणाईचा जीव कासावीस झाला आहे. त्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातील दुचाकीच्या पेट्रोलसाठी वेगवेगळ्या शक्कल लावल्या जात आहेत. पेट्रोलसाठी घरातील वृद्धांच्या आजाराच्या फाईल, भाजीपाल्यासाठी वापरली जाणारी कॅरेट, फॅमिली डॉक्‍टरकडे प्रिस्किप्शनच्या चिठ्ठीसाठी गळ घातली जात आहेत. यामुळे डॉक्‍टर, पोलिस व पेट्रोलपंप चालकांची डोकेदुखी वाढली आहे.
 
कोरोनामुळे आचारसंहिता लागू असताना ग्रामीण भागातील युवापिढीकडून पेट्रोलसाठी अनेक युक्‍त्यांचा वापर केला जात आहे. दुचाकीवर भाजीपाल्यासाठी वापरली जाणारी मोकळी रिकामे कॅरेट, गाडीवर ओला चारा, घरातील आजारी माणसांच्या जुन्या फाईल, फॅमिली डॉक्‍टरकडून प्रिस्किप्शनच्या चिठ्ठ्यांसाठी गळ घातली जात आहे. मात्र, किरकोळ आजार असणाऱ्यांना डॉक्‍टर दाद न देता घरी बसण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.

लॉकडाउनच्या काळात गावात गल्लोगल्ली दुचाकीवरून फिरणाऱ्या युवकांना चांगलाच चाप बसला आहे. विनाकारण फिरणाऱ्या युवकांना पोलिसांना लाठ्यांचा प्रसादही दिला आहे, तर दोन दिवसांपूर्वी मायणीत पोलिसांनी कारवाईत सुमारे 50 दुचाकी जमा करून घेतल्या आहेत. अनेक युवक गावातील पेट्रोल पंपावरच्या कामगारांशी, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. पंपावरचे कर्मचारी हे पोलिसांच्या हजेरीतच पेट्रोल विक्री करणे पसंत करीत आहेत. कित्येकदा कर्मचाऱ्यांना अंगावर जाऊन शिवीगाळ करणे, ताटकळत पंप परिसरात घिरट्या मारणे, भाजीपाल्याची रिकामी कॅरेटसह दुचाकीवरून पंपवार हजेरी लावणे, गावातील मोठ्या व्यक्तीस फोन लावणे 
या प्रकाराने डॉक्‍टर, पोलिस व पेट्रोल पंपचालकांची डोकेदुखी वाढली आहे. समाजहितासाठी लॉकडाउनच्या काळात घरी बसणे बंधनकारक असताना युवकांनी संयम राखणे गरजेचे ठरत आहे. 

चमकण्यासाठी माेदी एकही संधी साेडत नाहीत काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची टीका

कोरोनासाठी हवे 21 लाख कोटींचे पॅकेज : पृथ्वीराज चव्हाण

नियमाला हरताळ...  

दरम्यान, काही पोलिस कर्मचाऱ्यांकडून पेट्रोलपंपावर तोंडदेखली भूमिका घेत पेट्रोलसाठी गाड्या सोडल्या जात असल्याचा आरोप वाहनचालकांकडून गेला जात आहे. 



पोलिसांकडून पेट्रोलसाठी आलेल्या दुचाकीची चौकशी करूनच त्यास पेट्रोल दिले जाते. विनाकारण पोलिसांशी हुज्जत घातल्यास पोलिस कारवाई केली जाईल. 

 शहाजी गोसावी, पोलिस उपनिरीक्षक, मायणी पोलिस ठाणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला मॅच सोडून "घरी जा" असं का म्हटलं? इंडिया अ च्या सामन्यात अचानक का वाढला तणाव; जाणून घ्या काय घडलं

Mobile Keypad Unique Uses : फक्त टायपिंगसाठी नसतो मोबाईलचा कीपॅड! 99% लोकांना माहिती नाहीत सिक्रेट फीचर्स

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

SCROLL FOR NEXT