piles of mud in maternity hospital at belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ; प्रसुतीगृहातच टाकले मातीचे ढिगारे 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्हा रुग्णालयातील प्रसुतीगृहाचा गलथान कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अस्वच्छतेमुळे गर्भवती, माता आणि बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून तेथील मातीचे ढिगारे वार्डातच टाकण्यात आले आहेत. त्याचा वॉर्डातील माता व बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

गेल्या दोन आठवड्यापासून हा प्रकार सुरु असून बांधकामाच्या साहित्याची तेथूनच ने-आण करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीकोनातून दुरुस्तीकाम पूर्ण होईपर्यंत तेथील माता आणि बालकांना अन्य वार्डात हलविण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेवरुन बिम्स प्रशासनाला आमदार अनिल बेनके आणि मुख्यमंत्र्याचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी अनेकवेळा खडसावले आहे; पण तेथील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. प्रसुतीगृहातील स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. स्वच्छतागृहासह पिण्यासाठी पाण्याचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन पाणी आणण्याची वेळ येत आहे. प्रसुतीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील एका वार्डच्या स्वच्छतागृहाचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. खोदकाम करण्यात आलेले जुने साहित्य वार्डातच टाकण्यात आले आहे. त्यामुळे कमालीची दुर्गंधी पसरली आहे. 

दरम्यान, या ठिकाणाहून बाळंतीण, नातेवाईक, परिचारिका आणि डॉक्‍टर ये-जा करीत आहेत. त्यामुळे मातांच्या खाटाजवळ दुर्गंधी पसरत आहे. नवीन बांधकामासाठी लागणारे साहित्यही तेथूनच ने-आण करण्यात येत आहे. फरशी बसविण्यासाठी मशीनचा वापर करण्यात येत असल्याने आवाज आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत रुग्णांच्या जिवाशी हा खेळ चालला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांतून करण्यात येत आहे. त्यामुळे तेथील गर्भवती, बाळतिणींसह बालकांना अन्य वार्डात हलविण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

"प्रसुतीगृहातील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याबाबतची आपल्याला कल्पना नाही. याची लवकरच माहिती घेण्यात येईल, असा प्रकार असल्यास तेथील रुग्णांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येईल.'' 
-डॉ. विनय दास्तीकोप, वैद्यकीय संचालक, बिम्स 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT