Forts-Diwali-Festival
Forts-Diwali-Festival 
पश्चिम महाराष्ट्र

Diwali 2019 : बाजारपेठेत दाखल झालेले हे किल्ले तुम्ही पाहिले का?

सुस्मिता वडतिले

सोलापूर : दिवाळी जवळ आली, की चिमुकल्यांना वेध लागतात ते किल्ला बनवण्याचे. सर्वांपेक्षा उत्कृष्ट किल्ला व्हावा म्हणून चिमुकले धडपडतात. किल्ल्याची व्यवस्थित उभारणी करुन त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची स्थापना केली जाते. हीच गरज ओळखून बाजारात शिवाजी महाराज आणि मावळ्यांसह बनवलेले किल्ले विक्रीसाठी दाखल झाले आहेत. 

वेगवेगळ्या प्रकाराचे चविष्ट, रुचकर आणि खुशखुशीत पदार्थांशिवाय दिवाळी हा सण पूर्णच होत नाही. अवघ्या काही दिवसांवर सण येऊन ठेपल्याने बच्चेकंपनींची स्वारी आता गड- किल्ले तयार करण्याकडे वळत आहे. दिवाळीमध्ये आजही लहानमुलांना किल्ल्यांचे आकर्षण असल्याचे दिसून येते. या सणामुळे मुलांमध्ये शिवाजी, मावळे आणि किल्ले याविषयी नव चैतन्य निर्माण होते. एक नवा उत्साह त्यांच्यात संचारलेला असतो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात पुतळ्याच्या स्वरुपातील शिवाजी, मावळे आणि किल्ले विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हौशी किल्लाप्रेमींसाठी लाईंटग असणारे 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस' आणि प्लायवूडपासून बनविलेले किल्ले दाखल झालेले असून त्यांना चिमकुल्यांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे.

सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज आणि पंखेवाला, मशालवाला, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, गड चढणारा मावळा, बाजीप्रभू देशपांडेंच्या रुपातील मावळे, नववधू, हिरकणी, विठ्ठल-रुक्‍मिणी, तुळशी वृंदावन, गवळी-गवळीण, भाजीवाला- भाजीवाली, पोलिस, स्काऊड गाईड, लेडी सैनिक अशी अनेक चित्रेही दाखल झाल्यामुळे चिमकुल्यांचे पाय तिकडे खरेदीसाठी वळत आहेत.

लाईंटगचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे किल्ले - 100 ते 600 
लाईंटगचे प्यालवूडचे किल्ले - 200 ते 600 
शिवाजी महाराज - 20 ते 500 
मावळे - 20 ते 200 
तोफे - 20 ते 100 

आम्ही अनेक वर्षापासून हा व्यवसाय करत आहे. सर्व माल पेण, अलिबाग, पुणे या ठिकाणांहून विक्रीसाठी आणला जातो. यंदा अनेक प्रकारचे किल्ले बाजारात दाखल झाले आहे. तरीदेखील, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी आहे. 
- संजय दास, विक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT