पश्चिम महाराष्ट्र

#SSCL अखेर शानभाग विद्यालय तरले

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः सकाळ स्कूल क्रिकेट लिग स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात केएसडी शानभाग विद्यालयाने विजय मिळविला. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात महाराजा सयाजीराव विद्यालयाचा पराभव करत पोदार इंटरनॅशनल स्कूलने 120 धावांनी विजय मिळविला.
 
न्यू इंग्लिश स्कूल आणि केएसडी शानभाग विद्यालय या सामन्याचे नाणेफेक  डॉ. अविनाश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शानभाग स्कूलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यू इंग्लिश स्कूलने 18.3 षटकांत सर्वबाद 76 धावा केल्या. त्यामध्ये समर्थ चोपडेने 13 आणि हर्षवर्धन अष्टेकरने 16 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

शानभाग स्कूलने हे आव्हान फक्त 9.4 षटकांत 3 विकेटच्या मोबदल्यात 77 धावा करून पूर्ण केले. ओम खटावकरने 27, ओम शिंदेने 10, तर आकाश पांडेकरने 12 धावा केल्या. या संघाच्या ओम खटावकरने सामनावीर पारितोषिक जिंकले. घार्गे - साळुंखे असोसिएटसचे सुधीर घार्गे यांच्या हस्ते सामनावीरचे पारितोषिक देण्यात आले. 

दरम्यान, महाराजा सयाजीराव विद्यालय आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेला सामना एकतर्फी झाला. पोदार स्कूलने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा केल्या. "पोदार'च्या साहिल औताडे याने 32 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकार खेचत 75 धावा केल्या, तसेच कौशल भडगावे याने नाबाद 46 आणि कपिल जांगीडने 20 धावा केल्या.

त्याला प्रत्युतर देताना महाराजा सयाजीराव विद्यालयाचा डाव फक्त 10.4 षटकांत संपला. या संघाने सर्वबाद 53 धावा केल्या. पोदार स्कूलच्या कौशल भडगावे यास रमेश शू मार्टचे रवींद्र खत्री यांच्या हस्ते सामनावीर पारितोषिक देण्यात आले. 

संक्षिप्त धावफलक ः 
न्यू इंग्लिश स्कूल ः 18.3 षटकांत सर्वबाद 76. समर्थ चोपडे 13 (24 चेंडूत 2 चौकार), हर्षवर्धन अष्टेकर 16 ( 24 चेंडूत 3 चौकार). ओम खटावकर 3-1-5-3, ओम केसरकर 4-0-21-2 पराभूत विरुद्ध केएसडी शानभाग स्कूल ओम खटावकर 27 (19 चेंडूंत 4 चौकार), आकाश पांडेकर 12 (10 चेंडूंत 1 चौकार, 1 षटकार). नेत्रदीप वैद्य 3-0-8-2. 


पोदार इंटरनॅशनल स्कूल विजयी

संक्षिप्त धावफलक ः 
पोदार इंटरनॅशनल स्कूल 20 षटकांत 6 बाद 173. साहिल औताडे 75 (38 चेंडूंत 10 चौकार 3 षटकार), कौशल भडगावे नाबाद 46 (32 चेंडूंत 5 चौकार), कपिल जांगीड 20 (28 चेंडूंत 3 चौकार). साहिल वाडते 4-0-22-3, यशराज खताळ 4-0-48-2. विजयी विरुद्ध महाराजा सयाजीराव विद्यालय 10.4 षटकांत सर्वबाद 53. सौमित्र कचरे 10 (13 चेंडूंत 2 चौकार), कौशल भडगावे 3-0-21-3, अलोक गायकवाड 2.4 -0-6-3, अथर्व डोईफोडे 1-0-3-2. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT