crime
crime 
पश्चिम महाराष्ट्र

काळवीटाचे मांस शिजवल्याप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील खडकी येथे एका काळवीटाची शिकार करून त्यांचे मांस शिजवल्या प्रकरणी वनविभागाने ताब्यात घेतलेल्या अजय पपल्या शिंदे (वय 29) व सतिश पपल्या शिंदे (वय 25, दोघे रा.खडकी) या दोघांना न्यायालयात न्यायाधीश आर.व्ही.नडगदल्ली यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

तालुक्यातील ही पहिलीची घटना असल्याने खळबळ उडाली. त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेची हकीकत अशी की खडकी येथील तांड्यावर रात्री नऊच्या दरम्यान एका काळवीटाची शिकार करून त्याचे मांस शिजवून खात असल्‍याची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्रचे अधिकारी विलास पवळे यांना समजल्यावर पो.कॉ.सागर लांडे, राजू आवटे, महिला पोलिस रूपाली रेडेकर, वनपाल सुभाष बुरूंगले, वनरक्षक गोरख माळी, श्रीशैल्य पाटील, भागवत मासाळ, सोमनाथ होनमाने, शंकर रूपनर, दशरथ बुरूंगले, मधुकर बनसोडे, आण्णा अवघडे, रमेश माने, दर्‍याप्पा न्यामगोंडे आदींनी छापा टाकून वरील दोघांना ताब्यात घेतले.

यावेळी शिजवलेले काळविटाचे मांस तसेच काळवीटाची दोन शिंगे व कातडे पूर्वी शिकार केलेले काळविटाचे जुने कातडेही वनविभागातील अधिकाय्रानी जप्त केले.न्यायालयात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या काळवीटाची तस्करी झाली आहे का? शिवाय या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का या तपासासाठी सात दिवसाची पोलीस कोठडीतून द्यावी अशी मागणी केली. परंतु आरोपी हे येथील नागरिक असून अशा प्रकारची तस्करी यापूर्वी झाली नाही.मयत झालेले काळवीट पाहण्यासाठी गेल्यावर त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तीवाद अॅड धनंजय हजारे यांनी मांडला सरकारपक्षाकडून अॅड बनसोडे यांनी बाजू मांडली.दोन्ही बाजूच्या युक्तीवाद ऐकून न्यायाधीस आर.व्ही.नडगदल्ली ही कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT