Sangli ZP Election Result Sangli Marathi News
Sangli ZP Election Result Sangli Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटलांची तलवार म्यान ; सांगली झेडपीत पुन्हा भाजप...

सकाळ वृत्तसेवा

सांगली : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवण्यासाठी उपसलेली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे आता मिनी मंत्रालयात सत्ता कायम राखण्यात भाजप यशस्वी झाले आहे. अध्यक्षपदी म्हैसाळ येथील प्राजक्ता कोरे यांची तर उपाध्यक्षपदी बुधगाव येथील शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची निवड केवळ औपचारिकता राहिली आहे. दुपारी चार वाजता ते निश्‍चित होईल. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने अर्ज दाखल केले असले तरी माघारीसाठी मनधरणी सुरु असून निवडून बिनविरोध होईल, असे संकेत मिळत आहेत. सांगली जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे.

जयंतराव म्हणाले तुमचा निर्णय घ्या

येथील सत्तासमीकरणांत आकडेवारी मोठी रंजक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र आली तर बदल घडू शकतो, असे चित्र होते. त्यासाठी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हालचाली सुरु झाल्या होत्या, मात्र त्या फार पुढे गेल्या नाहीत.शिवसेनेकडून मुंबईतील नेत्यांनी फारसा रस दाखवला नाही. शिवसेनेतील घोरपडे, बाबर आणि नायकवडी या तीन गटांना आपल्याकडे वळवता येणार नाही, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी भाजपचे नाराज खासदार संजयकाका पाटील यांनी आपले सदस्य भाजपच्या गोटात पाठवून दिल्याने महाविकास आघाडीची शेवटची आशा मावळली. त्यानंतर जयंतरावांनी तलवार मान्य केली. काल रात्री जयंतरावांनी शिवसेना आमदार अनिल बाबर यांना फोन केला. आपले काही जमणार नाही, तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता, असा थेट निरोप पाठवला. 

माघारीची आता  चिंता

त्यानंतरही राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे सदस्य मात्र महाविकास आघाडीची ताकद दाखवूया, असा आग्रह धरून होते. त्यांनी सकाळी अनिल बाबर यांचे चिरंजीव आणि मावळते उपाध्यक्ष सुहास बाबर यांना गळ घातली. उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करा, असा आग्रह धरला. बाबर यांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. हे करायचेच होते तर आधी चर्चा व्हायला हव्या होत्या, आता अचानक असे होणार नाही, असे स्पष्ट बजावले. त्यांतरही राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी अश्‍विनी नाईक यांचा तर कॉंग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तो आता माघारी घेतला जाईल का आणि निवडणूक बिनविरोध होईल का, याची औपचारिकता बाकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT