Pre-test results! 
पश्चिम महाराष्ट्र

परीक्षेआधीच निकाल!

विठ्ठल लांडगे

नगर : परीक्षा... जी दिलीच नाही, तिचा निकालही दिला. त्यातील काही विद्यार्थी पास, तर काही नापास. असा निकाल विद्यार्थ्यांच्या हातात पडल्याने जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या न्यू आर्टस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डोक्‍याला हात लावला आहे. परीक्षेच्या सहा महिने आधीच दुसऱ्या सत्राचे गुणदान करण्याची अफलातून किमया यातून साधली गेली. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना हे गुणदान झाले, त्या ऍनिमेशन विभागाचे प्रमुखच त्याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या "जिल्हा मराठा'च्या न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात बीएस्सी ऍनिमेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचे आज समोर आले. या विभागातील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक दोन दिवसांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात आले. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न दिलेल्या परीक्षेचेही गुणदान त्यात करण्यात आले आहे. एखाद्या नव्हे, तर या वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांना द्वितीय सत्राचेदेखील गुणांकन झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला. अर्थात, हा निकाल केवळ ऑनलाइन घोषित झाला आहे. अजून त्या गुणपत्रिकांची मूळ प्रत विद्यार्थ्यांच्या हातात पडलेली नाही. 

परीक्षा मे-2020मध्ये होणे अपेक्षित..! 

ऍनिमेशन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रासाठी सहा विषय आहेत. त्यांची परीक्षा साधारण शैक्षणिक वर्षाच्या शेवटी, म्हणजे साधारणपणे मे 2020मध्ये होईल. मात्र, या परीक्षेचे महाविद्यालयांतर्गत देण्यात येणारे गुण व परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठाकडून देण्यात येणारे गुण आताच देऊन टाकण्यात आले आहेत. त्यामुळे ही विद्यापीठाच्या यंत्रणेची चूक म्हणायची, की महाविद्यालयातील ऍनिमेशन विभागाची, हा संशोधनाचा विषय ठरतो. महाविद्यालयातून विद्यापीठाकडे दुसऱ्या सत्राच्या उत्तरपत्रिकाच गेलेल्या नाहीत. मग त्यांनी गुणदान केले कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

हा प्रकार खूपच चिंताजनक

न झालेल्या परीक्षेचे गुणदान झाले असेल, तर हा प्रकार खूपच चिंताजनक आहे. त्यातून काम करणाऱ्या यंत्रणेच्या कामाबद्दल शंका उपस्थित होणे साहजिक आहे. ऍनिमेशन अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी माझ्याकडेही आल्या आहेत. त्याची माहिती घेत आहे. विद्यार्थ्यांच्या निकालात असा गोंधळ झाला असेल, तर त्यात चूक कोणाची, हा संशोधनाचा विषय आहेच. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी तातडीने विद्यापीठाला पत्रव्यवहार केला जाईल. 
- शिवाजी साबळे, 
सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

गुणपत्रके विद्यापीठाकडून दुरुस्त करून घेऊ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचा निकाल ऑनलाइन पद्धतीने घोषित केला आहे. अजून मूळ गुणपत्रक मिळालेले नाही किंवा ऑनलाइनमध्ये झालेल्या गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी अजून विभागाकडे तक्रार केलेली नाही. तथापि, गुणपत्रिकेत असा गोंधळ झाला असेल तर निकालपत्रक बदलून देण्याची जबाबदारी विद्यापीठ यंत्रणेचीच आहे. ती गुणपत्रके विद्यापीठाकडून दुरुस्त करून घेऊ. 
- संतोष ठुबे, 
विभागप्रमुख, ऍनिमेशन अभ्यासक्रम, न्यू आर्टस महाविद्यालय, नगर 


"ऍनिमेशन' विद्यार्थ्यांची संख्या 
पहिले वर्ष : 59 
दुसरे वर्ष : 50 
तृतीय वर्ष : 45 
एकूण : 154 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

पुण्यातील ऐतिहासिक पर्वती टेकडीचे सौंदर्य धोक्यात? TDR वाटपाचा वाद पुन्हा पेटला; चतुःशृंगी-शनिवारवाड्याला वेगळा न्याय का?

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर, ४०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

iPhone 17 आजपासून भारतात उपलब्ध, खरेदीसाठी स्टोअरबाहेर झुंबड; मध्यरात्रीपासून रांगेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT