Fund
Fund 
पश्चिम महाराष्ट्र

‘सन्मान निधी’चे होणार चावडीवाचन

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - प्रधानमंत्री सन्मान निधीतील शेतकऱ्यांच्या माहितीचे ३१ मार्चनंतर गावोगावी चावडीवाचन होणार आहे. 

राज्यातील दीड लाख अल्प व अत्यल्प भूधारकांपैकी सन्मान निधीसाठी ३७ लाख खातेदार अपात्र ठरतील. आतापर्यंत ५९ लाख ९३ हजार लाभार्थींची माहिती अपलोड केली असून, आचारसंहितेपूर्वी सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारांचा पहिला हप्ता जमा करण्याच्या सूचना केंद्र स्तरावरून देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील सव्वा कोटी खातेदारांसह देशातील १२ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना सन्मान योजनेंतर्गत प्रत्येकी सहा हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान, या योजनेचा पुढील हप्ता जमा करण्याकरिता आचारसंहितेचा अडथळा ठरू शकतो का, याबाबत निवडणूक आयोगाकडून केंद्राने मार्गदर्शन मागविल्याचे सूत्रांनी सांगितले.

योजनेची स्थिती
१.५६ कोटी अपेक्षित लाभार्थी
५९.९३ लाख लाभार्थ्यांची माहिती अपलोड 
३७.१३ लाख अपात्र शेतकरी
१७१७.४० कोटी रु. पहिला हप्ता

निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता खातेदारांच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये लावल्या जाणार आहेत. त्या अंतिम करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांवर सोपविण्यात आले आहे.
- हनुमंत शिंदे, तंत्र अधिकारी, कृषी आयुक्‍त कार्यालय, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT