श्रीगोंदे (नगर) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. श्रीगोंद्यात बॅंकेसाठी 173 सेवा संस्था मतदार आहेत. मात्र, यातील तब्बल 172 संस्था थकबाकीत आहेत. त्यामुळे संचालकांना त्यांच्या नावे ठराव करता येणार नसल्याने, गावप्रमुखांची गोची झाली आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणारा ठराव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी नुकतीच संस्थाप्रमुखांची व सचिवांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीतून पुढे आलेल्या अडचणी संस्थाप्रमुखांच्या मनात धडकी भरवणाऱ्या आहेत.
तालुक्यात बॅंकेसाठी 173 संस्था सभासद आहेत. ज्यांच्या नावे ठराव होणार, त्यांना मानाचे स्थान तर असतेच; शिवाय उमेदवार "तगडे' असल्यास मोठ्या प्रमाणावर अर्थकारण फिरते. मात्र, या 173पैकी केवळ काष्टीतील शिवांजली या एकाच सेवा संस्थेच्या संचालकाच्या नावे बॅंक मतदार म्हणून ठराव होऊ शकतो. कारण, उर्वरित सगळ्या संस्था बॅंकपातळीवर थकबाकीत गेल्याने, या संस्थांतील संचालकांच्या नावे बॅंकेचा मतदार म्हणून ठराव घेता येणार नाही.
हेही वाचा ःलव्ह मॅरेज ते सायबर क्राईम
या संस्थांना क्रियाशील सभासदाच्या नावे ठराव करून त्याला संस्थेचा मतदार म्हणून पुढे करता येईल; मात्र त्यामुळे संचालक, परिणामी गावातील सहकारी संस्थांचे प्रमुख या बॅंक निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बॅंकेचा ठराव मिळविण्यासाठी संचालकपदावर पाणी सोडण्याची तयारी दाखवत काही जणांनी राजीनामे देऊन, सभासद म्हणून बॅंकेचा ठराव घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते. मात्र, अशा व्यक्तींच्या विरोधात सहकार खात्याकडे तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीचा ठराव रद्द होऊ शकतो. बॅंक निवडणूक राजकीय दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. माजी आमदार राहुल जगताप, विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची नावे बॅंक निवडणुकीसाठी पुढे येत आहेत. परिणामी, निवडणुकीत मोठे अर्थकारण होणार असल्याने, संचालक असणारी व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत ठराव मिळविण्यासाठी धडपड करीत असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा ः त्याला वीस वर्षे सक्तमजूरी
तर दिलेला ठराव बदलता येतो
18 डिसेंबर ते 16 जानेवारीदरम्यान संस्थेचे ठराव बॅंकेसाठी घेतले जातील. पेडगाव व शिरसगाव बोडखे संस्थांवर प्रशासक असले, तरी त्यांची निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास तेही यात भाग घेऊ शकतील. संस्थेची नव्याने निवडणूक झाली अथवा ठराव दिलेली व्यक्ती मृत झाली, तर दिलेला ठराव बदलता येतो.
- रावसाहेब खेडकर
सहायक निबंधक, श्रीगोंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.