पश्चिम महाराष्ट्र

Video : सीएए हटाव, संविधान बचाव घोषणांनी कऱ्हाड दुमदुमले

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : "सीएए हटाव, संविधान बचाव... नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी...., हिंदुस्थान हमारा है..., हमे चाहीए, आझादी....' या व अशा अनेक घोषणांनी शहर आज दुमदुमले. निमित्त होते नागरिकत्व कायद्याविरोधात बहुजन समाजाच्या वतीने आयोजित निषेध मार्चाचे. कायद्याविरोधात मोर्चात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा तेथून कन्याशाळामार्गे चावडी चौकातून आझाद चौकमार्गे दत्त चौकात नेण्यात आला. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मोर्चा तेथून नवीन प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयासमोर नेण्यात आला. 

हेही वाचा - भावी पिढीसाठी शिवसह्याद्री कूपर कार्पोरेशनचा अनाेखा उपक्रम
 
जरुर वाचा-  सादिक शेखने केले क्षणांत 50 हजार परत


तेथे मोर्चात सहभागी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मोर्चातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन मनोगत व्यक्त केले. या वेळी हा कायदा त्वरित रद्द करण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणेही झाली. त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या या कायद्याचा निषेध करत तो कायदा रद्द करण्याची मागणी केली.

हेही वाचा -  साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर अपेक्षांचे ओझे

हेही वाचा - सातारकरांनाे तुमचा वाहन परवाना सस्पेंड हाेऊ शकताे

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT