पश्चिम महाराष्ट्र

...तर पुन्हा देशात नोटाबंदीसारख्या रांगा लागतील

सकाळ वृत्तसेवा

मायणी (जि. सातारा)  : घुसखोरांना जरूर देशाबाहेर घालवा. मात्र, आमच्या पिढ्यान्‌ पिढ्या इंथल्या मातीत खपल्या. याच मातीत आम्ही भारतीय म्हणून जन्मलो, वाढलो. असे असताना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करण्याची आवश्‍यकता ती काय? असा सवाल माजी प्राचार्य इब्राहिम तांबोळी यांनी केला.

हेही वाचा - गुरुकुलच्या विजयात शार्दुल, आर्य, अद्वैतची चमकदार कामगिरी
 
सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात येथे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आयोजित समारोपप्रसंगी प्राचार्य तांबोळी बोलत होते. त्यावेळी मन्सूरभाई नदाफ, झाकीरभाई नदाफ, दाऊद मुल्ला, डॉ. तबीब गौस, हुमांयू तांबोळी, अंकुश निकाळजे, हाजी ईस्माईल बागवान, सागर भोसले, समीर नदाफ, विशाल कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - मुंबई बाजार समितीसाठी साताऱ्यातून फिल्डिंग

एनआरसी कायद्याची अंमलबजावणी केल्यास नागरिकत्व सिध्द करण्यासाठी नोटाबंदीसारख्या रांगा लागतील, असे स्पष्ट करून प्राचार्य तांबोळी म्हणाले, ""डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांना बहाल केलेल्या मूलभूत हक्कांना बाधा पोचविणारा हा कायदा आहे. त्यामुळे घटनाबाह्य कायद्याचा एकदिलाने विरोध करायला हवा. एकट्या आसाम राज्यातील लोकांच्या कागदपत्रांची छाननी करण्यास कोट्यवधीचा खर्च झाला आहे. तेथील सुमारे 19 लाख लोकांना स्वत:चे नागरिकत्व सिध्द करता आलेले नाही. एवढेच नव्हे तर माजी मुख्यमंत्री व कारगिल युध्दात हुतात्मा झालेल्या, शौर्यपदक मिळवलेल्या जवानांनाही नागरिकत्व सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे अनेक राज्यांनी त्या कायद्याच्या विरोधात दंड थोपटले आहेत.''

हेही वाचा-  Video : भारत बंदच्या पार्श्वभुमीवर कऱ्हाडमध्ये तणाव

अंकुश निकाळजे म्हणाले, ""केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांची मुस्कटदाबी करीत आहे. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत आहे. यापुढे एकीच्या बळावर सरकारचे सर्व मनसुबे धुळीस मिळवूया.''
 
दरम्यान, नुरानी मुस्लिम समाज, एकमिनार मुस्लिम समाज, टिपू सुल्तान यंग सर्कल, भीमराजा प्रतिष्ठान, लहुजी प्रतिष्ठान, अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान व समस्त मुस्लिम समाज संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने मोर्चा काढण्यात आला.

फुलेनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य रस्त्याने मोर्चा शिंदेवाडी रोडपर्यंत व परत चांदणी चौक असा काढण्यात आला. चांदणी चौकात मोर्चाचा समारोप झाला. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मन्सूरभाई नदाफ यांनी प्रास्ताविक केले. झाकीर नदाफ यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT