ganeshmurtekar 
पश्चिम महाराष्ट्र

गणपतीबाप्पा... कसं रे होणार..!

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) ः गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवाला महापुराचा फटका बसल्याने अद्यापपर्यंत न सावरलेल्या गणेश मूर्तिकारांवर यावर्षी कोरोनाचे सावट आढावले आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे गणेशमूर्तींसाठी आवश्‍यक प्लॅस्टर ऑफ पॅरिस, केसर, रंग आदींसह कच्च्या मालाची वाहतूक होत नसल्याने मूर्ती तयार करण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपाबरोबर मोठ्या मूर्ती करण्यावरही मर्यादा येण्याची शक्‍यता आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. 22 ऑगस्टला होणाऱ्या गणेशोत्सवावर त्याचे अधिक परिणाम होणार आहे. गेल्या वर्षी पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे गणेश मूर्तिकारांचे अतोनात नुकसान झाले. त्यातून सावरण्यापूर्वीच यावर्षीच्या उत्सवापूर्वीच मूर्तिकरांपुढे यक्ष प्रश्‍न निर्माण झाला आहे. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी राजस्थानवरून प्लॅस्टर ऑफ पॅरिस, तर आंध्र प्रदेश व केरळमधून केसर याचा कच्चा माल येतो. त्याशिवाय मुंबईसह मोठ्या बाजारपेठेतून रंग उपलब्ध होतो. ऑगस्टमध्ये होणाऱ्या या उत्सवासाठी अनेक मूर्तिकार एप्रिल, मे महिन्यापासून कच्चा माल मागवून पावसाळ्यात मूर्तिकामात मग्न असतात. काही जणांचे बारमाही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. लॉकडाउनमुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे मूर्तीसाठी आवश्‍यक प्लॅस्टर व केसराचा कच्चा मालाच मिळू शकलेला नाही. जिल्ह्यात सुमारे दहा हजार टन प्लॅस्टरची आवक होत असल्याचे सांगितले जाते. त्याद्वारे लाखोंची उलाढाला होते. 

समूहात कोरोनाचा वाढणारा संसर्ग पाहता, यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप कसे असेल हे सध्या तरी सांगता येणार नाही. त्यामुळे यंदा मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तीची मागणी कशी राहील, याबाबत मूर्तिकारांना चिंता आहे. त्यातच देशाची आर्थिक व राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे संकट अधिक असल्याने तेथली परिस्थितीही काय राहील, याची व्यावसायिकांसह मूर्तिकारांना चिंता आहे. कऱ्हाडमधून मुंबई, पुणे, धारवाड, बेळगाव, हुंबई, कोल्हापूर आदींसह विविध ठिकाणी जाणाऱ्या मूर्तींना यंदा कितपत मागणी राहील, याचीही व्यावसायिकांना चिंता भेडसावत आहे. 


गेल्या वर्षी पुरामुळे गणेशमूर्तिकारांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातून अद्याप आम्ही सावरलोही नाही. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षीचा गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होणार, याची चिंता भेडसावत आहे. लॉकडाउनमुळे कच्चा माल मिळू शकत नाही. त्यामुळे मूर्ती तयार करणेही अवघड बनले आहे. 

- मनोज कुंभार, मूर्तिकार, कऱ्हाड

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Housing Lottery: सामान्यांचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार! पुणे गृहनिर्माण मंडळाची ४१८६ घरांची ऑनलाईन सोडत, अर्ज कसा करायचा?

Omerga News : ढगफुटीमुळे आलूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; वाहतूक ठप्प

Latest Marathi News Updates Live : अतिरिक्त उत्पादनादरम्यान साखर उत्पादकांना विविधता आणण्याचे गडकरी यांचे आवाहन

Onion Price Crisis : कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पुकारले ‘फोन आंदोलन’!

'एक काळ असा होता जेव्हा बाबा स्टेशनवर झोपायचे' ललित प्रभाकरने सांगितलं कुटुंबाचा खडतर प्रवास, म्हणाला,'आई बाबा शेतकरी...'

SCROLL FOR NEXT