Rajapuri Turmeric Jaggery Gets Highest Price In Sangli Market  
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत राजापुरी हळद, गुळाला मिळाला 'असा' भाव

सकाळ वृत्तसेवा

सांगली - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्याच्या
मुहूर्तावर हळद आणि गुळाच्या सौद्यांना प्रारंभ झाला. राजापुरी हळदीला प्रति क्विंटल 8201 रूपये तर गुळाला प्रति क्विंटल 4251 रूपये उच्चांकी भाव मिळाला.

दिवाळीच्या सुटीनंतर पाडव्याच्या मुहूर्तावर हळद व गुळाचे सौदे काढले जातात. पाडव्याच्या मुहूर्तावर बाजार समितीमधील श्रीराम ट्रेडिंग कंपनीत राजापुरी हळदीचा सौदा झाला. त्यामध्ये बावची (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या हळदीला प्रति क्विंटल 8201 रूपये असा उच्चांकी दर मिळाला.

मनाली ट्रेडिंग कंपनीने ही हळद खरेदी केली. राजापुरी
हळदीला प्रति क्विंटल कमीत कमी सहा हजार रूपये ते सरासरी 7100 रूपये दर मिळाला आहे. तसेच जास्तीत जास्त 8201 रूपये इतका दर मिळाला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते हळद सौद्यास प्रारंभ झाला.

बाजार समिती सभापती दिनकर पाटील, सचिव व्ही. जे. राजेशिर्के, व्यापारी मनोहर सारडा, सनतकुमार आरवाडे, संजय किणीकर, शरद शहा, हार्दिक सारडा आदींसह अडते, शेतकरी
उपस्थित होते.

गुळाला प्रति क्विंटल 4251 रूपये उच्चांकी दर

पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे देखील सुरू झाले. मेसर्स निडगुंदी सिद्धेश्‍वर ट्रेडिंग कंपनीमध्ये झालेल्या सौद्यात निडगुंदी (ता. रायबाग) येथील शेतकरी वसंत लठ्ठे यांच्या गुळाला प्रति क्विंटल 4251 रूपये उच्चांकी दर मिळाला. मंगलमूर्ती ट्रेडिंग कंपनीने हा गुळ खरेदी केला. सौद्यावेळी सदस्य शीतल पाटील, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर आदींसह
गुळ खरेदीदार व अडते उपस्थित होते.

""बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या सौद्यामध्ये हळद व गुळाला उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे हळद व गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत माल विक्रीसाठी आणावा.''
- दिनकर पाटील, 
सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT