Rajendra Patil Yadravkar Gets Ministry Kolhapur Marathi News  
पश्चिम महाराष्ट्र

शिरोळला इतिहासातील दुसऱ्यांदा मंत्रीपद 

गणेश शिंदे

जयसिंगपूर ( कोल्हापूर ) - तीन पिढ्यांची राष्ट्रवादीशी एकनिष्ठता, अपक्ष आमदार आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद असा त्रिकोणी राजकीय प्रवास करुन राजेंद्र पाटील-यड्रावकर शिरोळ तालुक्‍याच्या इतिहासातील दुसरे मंत्री ठरले आहेत. माजी मंत्री (स्व) रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यानंतर तब्बल सुमारे 40 वर्षांनी मंत्रीपदाचा लाल दिवा शिरोळ तालुक्‍याच्या वाट्याला आला आहे. यड्रावकरांच्या मंत्रीपदामुळे तालुक्‍याच्या विकासाच्या अपेक्षा उंचावल्या आहेतच. शिवाय यड्रावकर गटालाही उभारी मिळाली आहे. 

वडील (स्व) शामराव पाटील-यड्रावकर यांनी राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून शिरोळ आणि हातकणंगले तालुक्‍यात सहकार, सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्राच्या माध्यमातून विकासात्मक कार्याचा आलेख उंचावत ठेवला. मात्र, दुर्दैवाने (स्व) शामराव पाटील-यड्रावकर यांचे आमदारकीचे स्वप्न दोन वेळा भंगले. त्यांच्यानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही जिवाचे रान केले. मात्र, पदरी दोनवेळा निराशाच आली. तरीही खचून न जाता यावेळच्या विधानसभा निवडणूकीत नियोजनबध्द प्रचार यंत्रणा हाताळत आमदारकीचा मान मिळविला. 

शिवसेनेतून मंत्रिपद 

आमदारकीनंतर नामदारकीसाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. महिन्याभरापासून त्यांच्या नावाभोवती मंत्रीपदाची चर्चा होती. मात्र, सततच्या राजकीय घडामोडीत याबाबत संभ्रम होता. रविवारी मध्यरात्री यड्रावकरांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाला. राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहूनही अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळविल्यामुळे शिरोळ तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलली असून गटालाही उभारी मिळाली आहे. आजवर सहकार, शैक्षणिक क्षेत्रात काम करुनही राजकारणात मात्र दुर्लक्षित असणाऱ्या यड्रावकरांना मंत्रीपदामुळे महत्व प्राप्त झाले आहे. आता मात्र विकासातून कायापालट करण्याची जबाबदारी यड्रावकर यांच्यावर पडली आहे. येणाऱ्या काळात तालुक्‍यातील तीन नगरपालिका, विविध ग्रामपंचायतींसह अन्य संस्थांवर आपला प्रभाव राखण्यासाठी त्यांना जीवाचे रान करावे लागणार आहे. 

स्वप्न पूर्ण 

वडील (स्व) शामराव पाटील-यड्रावकर यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंधरा ते वीस वर्षापासून राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी निकराचे प्रयत्न केले. अखेर आमदारकीबरोबर नामदारकीची जिद्दही पूर्ण केल्याने वडीलांचे स्वप्न पूर्ण झाले. 

शरद पवारांवरील निष्ठा कायम 

विधानसभेला राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली, तरीही राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शरद पवार यांच्यावरील निष्ठा तसूभरही कमी होऊ दिली नाही. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे एक निष्ठावंत आणि पवार यांचे खंदे समर्थक म्हणून यड्रावकरांची आजही ओळख तशीच आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: तब्बल ७ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी ठरणार अखेरची

Pandharpur Municipal Elections : 'दोन समाजात तेढ निर्माण करुन भालकेंनी निवडणूक जिंकली'; भाजप आमदार आवताडेंचा गंभीर आरोप

बापरे! किशोरी शहाणे यांच्या कारला धडक, अभिनेत्रीचा संताप, Viral video

Saving Scheme : बायकोसोबत या सरकारी योजनेत करा गुंतवणूक! वर्षाला मिळेल तब्बल 1,11,000 रुपये व्याज; पैसे पूर्ण सुरक्षित

Breaking News ZP Election : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT