Kalpanaraje Bhosale In Satara Muncipal Council 
पश्चिम महाराष्ट्र

Video पालिकेत गुंडशाही चालणार नाही - कल्पनाराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी आज पालिकेत येऊन सत्ताधारी सातारा विकास आघाडीची बैठक घेतली. ""कोणाच्या दबावात काम करू नका. अडचणी असतील तर थेट कारवाईची हिंमत ठेवा. येथे गुंडशाही चालणार नाही,'' असा इशाराही कल्पनाराजेंनी दिला.

हेही वाचा - आता काय म्‍हणायचं... नगरसेवकाने उतरविली पॅंट

नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात राजमाता कल्पनाराजेंनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले. त्या वेळी त्या म्हणाल्या, ""कोणाच्या दबावात काम करू नका. काही अडचणी असतील तर सोडविण्याची, त्यावर कारवाई करण्याची हिंमत ठेवा. सभागृहाची उंची कमी होईल, असे कोणतेही काम आपल्या हातून घडणार नाही, याची काळजी घ्या.''

नक्की वाचा - झेडपीचे मैदान पैशाच्या मोहापायी बकाल
 
बैठकीदरम्यान मल्हार पेठ येथील काही महिला सभागृहाच्या बाहेर आल्या होत्या. शौचालय दुरुस्तीच्या मागणीसाठी महिलांनी थेट सभागृह गाठल्याने कल्पनाराजे सभागृहातून उठून बाहेर आल्या. महिलांच्या या घाईबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच त्यांची मागणी तातडीने पूर्ण करण्याची सूचनाही नगराध्यक्षांना दिली. शौचालयांची देखभाल करणे, स्वच्छता राखणे हे तुमच्या हातात आहे. ते तुम्ही केले पाहिजे, असेही त्यांनी महिलांना सूचित केले. 

जरुर वाचा -  महाबळेश्‍वरच्या नक्षीदार काठ्यांची एक्झिट ?

यावेळी नगराध्यक्षांच्या दालनात उपाध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT