sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

FRP वरून राजू शेट्टींचे 'स्वाभिमानी' आक्रमक; पोलिस कार्यकर्त्यांत बाचाबाची

स्वाभिमानीकडून हा पुतळा काढून घेतल्याने भर मोर्च्यात रस्त्यावर धक्काबुक्की झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

स्वाभिमानीकडून हा पुतळा काढून घेतल्याने भर मोर्च्यात रस्त्यावर धक्काबुक्की झाली आहे.

सांगली - उसाच्या एफआरपी (FRP) आणि वीज कनेक्शन तोडणीवरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्वाभिमानीकडून (Swabhimani Shetkari Sanghtana) हा पुतळा काढून घेतल्याने भर मोर्च्यात रस्त्यावर धक्काबुक्की झाली आहे. दरम्यान, कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. सरकारचे रक्षकच, भक्षक बनले असून जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) याला जबाबदार असल्याचा हल्लाबोल राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे.

उसाची एक रकमी एफआरपी आणि सक्तीची वीज कनेक्शन तोडणे बंद करून दहा तास दिवसाची वीज द्यावी, या प्रमुख मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक तिरडी मोर्चा काढण्यात आला होता. (Sangli) यावेळी भर रस्त्यातच राजू शेट्टी, कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात प्रतिकात्मक कारखानदार याचा पुतळा काढून घेण्यावरून धक्काबुक्की झाली. यावेळी रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होत.

यावेळी शेट्टी म्हणाले, सरकारचे रक्षकच भक्षक बनले असून या साखर कारखानादार पालकमंत्र्यांच्या आश्रयाला आहेत. पण आम्ही एफआरपीचे तुकडे होऊ न देता एकरकमी एफआरपी घेणारच असे राजू शेट्टी यांनी खडासावून सांगितले आहे. दरम्यान कारखानदारांचे प्रतिकात्मक पुतळे नेत असताना त्यांची विटंबना झाली असून याला सर्वस्वी पोलिस जबाबदार असल्याची टीकाही झाली आहे.

पुढे ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कारखानदारी मेली आहे. याचे नेतृत्व पालकमंत्री जयंत पाटील करत आहेत. पण रडीचा डाव खेळून पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्यांचे टोळके निर्माण झाले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घेतला आहे. पण बिळात बसले असले तरी बिळात हात घालून एक रकमी एफआरपी घेणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Falls : आठवड्याचा शेवट गोड! सोन्याचे भाव दहा हजारांनी घटले, चांदीची ३ लाख ५० हजारांकडे वाटचाल

भारताचे ७१ ‘वाँटेड आरोपी’ फरार; परदेशात जगत आहेत विलासी जीवन, मोदी सरकारने जाहीर केला अहवाल...

IND vs NZ 3rd T20 : टी-२० मालिका विजयाची मोहीम आजच फत्ते? न्यूझीलंडविरुद्ध आज तिसरा सामना; ईशानच्या फॉर्ममुळे संजू अडचणीत...

Sindhudurg : महायुतीच्या झेडपीच्या ५ अन् पंचायत समितीच्या ६ जागा बिनविरोध; ठाकरेंच्या ११ उमेदवारांची माघार

Srirampur Crime: जिल्हा परिषद शाळेच्या जागेची परस्पर विक्री; श्रीरामपूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पाच जणांवर गुन्हा!

SCROLL FOR NEXT