swetpatrika
swetpatrika 
पश्चिम महाराष्ट्र

नक्‍की वाचाच...राज्याची श्‍वेतपत्रिका मार्चमध्ये निघणार !

तात्या लांडगे
सोलापूर : उत्पन्नात झालेली घट अन्‌ वाढलेल्या खर्चामुळे राज्याच्या डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर वाढला. सद्यःस्थिती राज्य सरकारवर पावणेसात लाख कोटींचे कर्ज असून व्याजापोटी सरकारला सुमारे 73 हजार कोटी दरवर्षी द्यावे लागत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मागील पाच वर्षांतील उत्पन्न अन्‌ खर्च, योजना व कामांवरील खर्चाची माहिती श्‍वेतपत्रिकेच्या माध्यमातून तयार केली जात आहे. मार्चपर्यंत श्‍वेतपत्रिका जाहीर केली जाणार असून तसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाला दिले आहेत.


आवश्‍य वाचाच...अरे वा....! सोलापुरातील 'डबेवाला' झाला न्यायाधीश

सरसकट कर्जमाफी करण्याचे नियोजन असतानाही राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने दोन लाखांची कर्जमाफी द्यावी लागल्याची खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी राज्याची नेमकी आर्थिक स्थिती कशी आहे, याची वस्तुस्थिती समोर येण्याच्या उद्देशाने वित्त विभागाला श्‍वेतपत्रिकेची माहिती मागविली आहे. त्यानुसार शासनाच्या सर्व विभागांकडून युद्धपातळीवर माहिती मागविण्यात आली आहे. मागील पाच वर्षांत राज्य सरकारला किती महसूल मिळाला, राज्याच्या उत्पन्नाची स्थिती पाच वर्षांत कशी राहिली, कोणत्या योजना व कामांवर किती खर्च करण्यात आला, याचा सविस्तर आढावाही मागविण्यात आला आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक होऊ लागल्याने राज्याच्या डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर कमी होत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी श्‍वेतपत्रिकेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.


आवश्‍य वाचाच....सोलापूर महापालिकेतील 'इतके' बनावट प्रमाणपत्रकधारक जाणार घरी


ठळक बाबी...
  • मागील पाच वर्षांतील आर्थिक स्थितीची मागविली माहिती : मार्चपर्यंत तयार होणार श्‍वेतपत्रिका
  • राज्य सरकारच्या खांद्यावर तब्बल सहा लाख 71 हजार कोटींचे कर्ज
  • कर्जापोटी राज्य सरकारला द्यावे लागते अंदाजित 73 हजार कोटींचे व्याज
  • राज्य सरकारकडून दरवर्षी केंद्राला दिला जातो पावणेदोन लाख कोटींचा महसूल
  • कोणत्या कामांवर अन्‌ योजनांवर किती खर्च झाला : उत्पन्न अन्‌ खर्चाचा ताळमेळ याचीही मागविली माहिती

हेही वाचाच...'सकाळ'ला सोलापुकरांच्या मनात मानाचे स्थान

तीन महिन्यांत पूर्ण होईल माहिती
मागील पाच वर्षांत कोणत्या योजनांवर किती खर्च झाला, उत्पन्न अन्‌ खर्चाचा ताळमेळ, राज्याची सद्यःस्थिती, राज्याच्या डोक्‍यावरील कर्ज आणि त्यावरील व्याज याची माहिती सर्व विभागांकडून मागविण्यात आली आहे. तीन महिन्यांत श्‍वेतपत्रिकेची माहिती तयार होईल.
- राजगोपाल देवरा, मुख्य सचिव, वित्त विभाग, मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Lok Sabha: '500 रुपये एका मताची किंमत'; अमोल कोल्हेंनी व्हिडिओ शेअर करत केला मोठा दावा

Mamata Banerjee: ममतांनी सांगितलं NDA अन् INDIAला किती जागा मिळणार; म्हणाल्या, कालच...

Rohit Sharma: फक्त रोहितचाच जलवा! सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडियाची T20 जर्सी लाँच, पण हार्दिककडे दुर्लक्ष, पाहा Video

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पडली पार

Mumbai Rain Accident: घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले, जवळपास 80 गाड्या दबल्या, अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT