shivsena padadhikari resing
shivsena padadhikari resing 
पश्चिम महाराष्ट्र

खरचं का...तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदासाठी पदाधिकारी देणार राजीनामे

तात्या लांडगे
सोलापूर : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. किमान सोलापुरचे पालकमंत्रीपद त्यांना मिळेल, असा विश्‍वासही होता. मात्र, आमदार सावंत यांना मंत्रिपद नाकारण्यात आले. राज्यभर विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्‍त करीत राजीनामे दिले. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनीही राजीनाम्याची तयारी दर्शविली असून आता त्यांची सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक सुरु आहे.

हेही आवश्‍य वाचाच...राजीनामे काय देताय..मुंबईला जाऊन गच्ची धरुन विचारा

मागील मंत्रिमंडळात सहा महिन्यांसाठी जलसंधारण मंत्रीपद सांभाळणाऱ्या तानाजी सावंत यांनी भूम-परांडा मतदारसंघातून आमदारकी मिळविली. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात नक्‍की समावेश होईल, असा सोलापुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वास होता. मात्र, सोलापूर जिल्ह्यात करमाळा, शहर मध्य, मोहोळ, बार्शी या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. जुन्यांना डावलून नव्यांना पदाधिकारी म्हणून दिलेली संधी, उमेदवारी वाटपावेळी झालेली बंडखोरी अन्‌ बंडखोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळे अनेकांनी सावंत यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्‍त केली. काही पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्री गाठून नाराजी व्यक्‍त केली. त्यामुळेच बहूतेक तानाजी सावंत यांना मंत्रिपद नाकारल्याची चर्चा आहे. परंतु, जिल्ह्यातील शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे सोलापुरचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान द्यावे, सोलापूरचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवावे, अशा मागण्या तालुकाप्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी व जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांनी या बैठकीत केल्या आहेत. सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले, भाऊसाहेब आंधळकर, श्रावण भवर, दिलीप टेकाळे, शिवाजी भोसले यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख उपस्थित होते.


हेही आवश्‍य वाचाच...धक्‍कादायक... अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

पराभूत उमेदवार अन्‌ महापालिका नगरसेवकांची दांडी
विधानसभा निवडणुकीत पक्षातील नेत्यांनी बंडखोरीचा इशारा दिल्यानंतरही तानाजी सावंत यांच्या माध्यमातून ज्या उमेदवारांना संधी मिळाली, त्यांनीच या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामध्ये माजी आमदार दिलीप माने, नागनाथ क्षिरसागर, रश्‍मी बागल, दिलीप सोपल यांचा समावेश आहे. दुसरीकडे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, उपशहरप्रमुख प्रताप चव्हाण हेही या बैठकीला दिसले नाहीत. सोलापूर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवकही अनुपस्थित असल्याचे पहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT