Recruitment in Belgaum from 15th December 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात 15 डिसेंबरपासून सैन्यभरती ; खेळाडू, आजी-माजी सैनिकांचा मुलांना संधी 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून डिसेंबर महिन्यात सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण कोटा अंतर्गत खेळाडू व सेवारत तसेच माजी सैनिकांची मुले आणि बंधूंसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. 

मराठा इन्फंट्रीमध्ये रिक्त असलेल्या सैनिक सामान्य सेवा, ट्रेडमन, क्‍लर्क पदासाठी ही भरती होणार आहे. 15 डिसेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरवात होणार असून पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडू, 16 डिसेंबरला महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यातील खेळाडूंची भरती प्रक्रिया पार पडेल. आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी 17 पासून भरती सुरु होईल. पहिले दोन दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी भरती चालेल. तर 19 रोजी मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील उमेदवार भाग घेऊ शकतात.

21 रोजी सोल्जर ट्रेडमन पदासाठी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी असेल. तर 22 रोजी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील उमेदवार भाग घेऊ शकतात. 23 डिसेंबर रोजी सोल्जर क्‍लर्क व स्टोअर किपर पदासाठी भरती होणार असून यात केवळ मराठा इन्फंट्रीत सेवा बजावणारे आणि निवृत्त जवानांच्या मुलांना भरतीची संधी असेल. 31 जानेवारी 2021 रोजी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. 

सामान्य सेवा भरतीसाठी उमेदवार 1 ऑक्‍टोबर 1999 पूर्वी आणि 1 एप्रिल 2003 नंतर जन्मलेला नसावा. ट्रेडमन व क्‍लर्कसाठी 1 ऑक्‍टोबर 1997 पूर्वी व 1 एप्रिल 2003 पूर्वी जन्मलेला नसावा. ही भरती केवळ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू, सैन्यात सेवा बजावणारे जवानांचे भाऊ, माजी सैनिकांची मुले, वीरपत्नींची मुले यांच्यासाठी राखीव असून इतरांना यात भरतीची संधी नसेल. भरतीसाठी येणाऱ्या युवकांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाची प्रमाणपत्रे, माजी सैनिकांची मुले असल्यास रिलेशन प्रमाणपत्र, 25 पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, गुणपत्रिकांच्या झेरॉक्‍स प्रतीसह भरतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Mumbai Crime: हिंदी बोलली म्हणून ६ वर्षाच्या चिमुकलीला संपवलं; आईचं निर्दयी कृत्य, पण तपासात वेगळंच सत्य समोर आलं

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

Loni Kalbhor Crime : सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारीवर कडक कारवाई; एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध!

Dhule Municipal Election : धुळ्यात निवडणुकीची चुरस वाढली; १२०० हून अधिक अर्ज नेले, पण दाखल एकही नाही!

SCROLL FOR NEXT