Gokul Dudh Sangh Cow Milk esakal
पश्चिम महाराष्ट्र

Cow Milk : 'गोकुळ'नंतर राज्यातील खासगी-सहकारी दूध संघांकडून गाईच्या दूध दरात 'इतक्या' रुपयांची कपात

१ ऑक्टोबरपासून ही दर कपात आणि वाढ ग्रहीत धरली जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्वच खासगी आणि सहकारी संघांकडून गाय दूध कपातीबाबत चर्चा सुरू होती.

कोल्हापूर : गोकुळ दूध संघानंतर (Gokul Dudh Sangh) आता राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या प्रतिलिटर गाय दुधाच्या दरामध्ये २ रुपयांची कपात केली आहे. तर, म्हैस दुधाला प्रतिलिटर एक ते दीड रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

१ ऑक्टोबरपासून ही दर कपात आणि वाढ ग्रहीत धरली जाणार आहे. सांगली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उत्पादकांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरणार आहे. देशात आणि राज्यात गाईच्या दुधाचे उत्पादन वाढले असून, मागणी घटली आहे. बटर आणि पावडरचे दर कमी झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघाकडून ही दर कपात जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाईच्या प्रतिलिटर दरामध्ये दोन रुपयांची कपात जाहीर केली होती. तर, म्हैस दुधासाठी प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ केली आहे. राज्यातील गाय दुधाचे वाढते उत्पादन पाहता, पुरवठ्याएवढी मागणी होत नाही.

दरम्यान, गोकुळने दोन दिवसांपूर्वी म्हैस दुधाला प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ देत गाय दुधात दोन रुपयांची कपात केल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. यातच आता इतर सर्वच संघांनी दर कपात केल्यामुळे उत्पादकांच्या रागात आणखी भर पडणार आहे. बैठकीस श्रीपाद चितळे, किरीट मेहता, नेताजी पाटील, विशाल पाटील, शितल थोटे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT