sangli Esakal
पश्चिम महाराष्ट्र

रिल्सचं व्यसन तरूणाला भोवलं; सापांसोबत स्टंट...पोलिसांकडून समाचार

पोलिसांकडून सांगलीच्या तरूणाचा समाचार

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मिडियावर रिल्सचे फॅड वाढले आहे. तरूणांपासून वयोवृध्दापर्यंत छोट्या-छोट्या गोष्टीचे व्हिडिओ शेअर केलेले नियमित पाहायला मिळतात. मात्र रिल्सच्या आहारी गेलेल्या एका सांगलीच्या (Sangli) तरूणाला रिल्सचं (Reels) व्यसन चांगलच भोवलं. या सर्पमित्र तरुणाने नागाचं (Snake)चुंबन घेऊन सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला. हा व्हिडिओ वन्यजीव (Forest Department) संरक्षणाच्या हाती लागताच अधिनियम १९७२ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या वाळवा तालुक्यातील मौजे बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे हा सर्पमित्र नाग आणि साप पकडतो. सापाला जिवनदान देणाऱ्या या सर्पमित्राला रिल्सचं व्यसन जडले. या व्यसनातून त्याने सापाचे चुंबन घेणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला.

सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन्यजीव संरक्षणाच्या तो हाती लागताच या तरूणावर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई उपवनसंरक्षक विजय माने, डॉ अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव वनक्षेत्रपाल शिराळा, सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर व अमोल साठे वनरक्षक बावची व निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

अश्या प्रकारे जीवघेणे स्टंट कोणीही करू नये. नागाला अथवा सापाला इजा पोहचतील असे कृत्य केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय माने यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Soybean Prices : शेतकऱ्यांच सोनं कवडीमोल भावात, सोयाबीनच्या भावावर शेतकऱ्यांची फरफट; ४ हजार ४०० रुपयांमध्ये खरेदी

Latest Marathi News Live Update : अनुसूचित जमातीमध्ये सहभागी करून आरक्षण देण्यात यावे , बंजारा समाजाचा धुळ्यात मोर्चा

Stanford University: ‘संजीवनी’च्या दाेन प्राध्यापकांचा अमेरिकेत संशोधनाचा झेंडा; सहा लाख संशोधकांत उच्चस्तरीय संशोधक म्हणून गणना

Bhoom Nagar Parishad Election : भूम नगरपरिषदेच्या दहा प्रभागाचे आरक्षण जाहीर; काही ठिकाणी खुशी काही ठिकाणी गम

SCROLL FOR NEXT