सांगली ः कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना साळसिंगे (ता. खानापूर) येथील कोरोनाबाधित महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला. त्यांच्यासह जिल्ह्यातील आज 46 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान राज्यातील टाळेबंदी 31 मे पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर सांगली जिल्ह्यात कोणकोणत्या बाबीत शिथिलता मिळणार याबाबत उत्सुकता असून उद्या जिल्हाधिकारी याबाबतचे धोरण जाहीर करणार आहेत.
साळसिंगे (ता. खानापूर) येथे 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. खानापूर तालुक्यात पहिलाच कोरोनाचा रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. सहा जणांचे एक कुटुंब अहमदाबादहून गावी आले होते. शनिवार (ता. 9) रोजी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर मिरज येथील कोरोना हॉस्पिटलकडे उपचार सुरू होते. त्यांची आज स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्यासह 46 निगेटिव्ह आले आहेत.
हे पण वाचा : वाह...किती छान.. येथील बनात थुईथुई नाचतोय मोर
गेल्या तीन दिवसांत रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. आज दिवसभरातही शिराळा तालुक्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. सध्यस्थितीत 20 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 34 रुग्ण बरे झाले आहेत. परदेशवारीसह परजिल्ह्यातून आत्तापर्यंत चौदाशे व्यक्ती आल्या आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी 177 जणांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. मिरजेतील क्रीडा संकुल येथे 51, इस्लामपूर 14, शासकीय तंत्रनिकेतन येथे 46, कडेगाव येथे 23, कवठेमहांकाळ येथे 8, जत येथे 14, खानापूर येथे 13, तर तासगाव येथे 8 जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन आहेत.
आटपाडीत येणारे रस्ते झाले सील
आटपाडी ः आटपाडीत सापडलेल्या कोरोणाबाधित रुग्णाच्या संपर्कातील पंधरा लोकांना तपासणीसाठी प्रशासनाने मिरजेला पाठवले. आटपाडी प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद केले. तसेच आमदार अनिल बाबर यांनी महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेऊन सूचना केल्या.
हे पण वाचा : सलगरे चेकपोस्टवर ताण वाढला
दिल्लीहून आटपाडीत आलेल्या एकाला कोरोना झाल्याचा काल अहवाल आला होता. त्यामुळे आटपाडीत खळबळ उडाली.
त्याच्यासोबतच त्याची पत्नी आणि मुलीला तपासणीसाठी पाठवले होते. यानंतर संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची काल रात्रीच आरोग्य विभागाने माहिती संकलित केली. संपर्कात आलेल्या अकराजणाना कालच तपासणीसाठी पाठवले तसेच आज झरे येथील दोघे आणि आटपाडीतील दोघे असे पंधरा जणांना तपासणीसाठी पाठवले. तहसीलदार सचिन लंगुटे आणि पोलिस निरीक्षक बजरंग कांबळे यांनी काल रात्रीच रुग्ण राहात असलेल्या ठिकाणापासून पाचशे मीटर परिसर बंद केला.
आटपाडीत येणारे शेटफळे, सांगोला, दिघंची, करगणी, निंबवडे, आवळाई गावचे रस्ते पूर्ण बंद केले. शहरातील गल्लीबोळातील रस्तेही बंद केले. आमदार अनिल बाबर यांनी महसूल, पोलीस, पंचायत समिती प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये रुग्ण सापडलेले ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे पाचशे मीटर झोन करण्याऐवजी शंभर मीटर परिसरात झोण करणे आणि त्यानंतरचा परिसर बफर झोन करणेचा निर्णय झाला तसेच काही सूचना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.