Restraint for unauthorized medical bills in government service
Restraint for unauthorized medical bills in government service 
पश्चिम महाराष्ट्र

शासकीय नोकरीत अवास्तव मेडिकल बिलांना बसणार लगाम 

तात्या लांडगे

सोलापूर : शासकीय नोकरीत असताना आजारी पडलेल्या वर्ग एक ते वर्ग चारच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता अवास्तव मेडिकल बिल मिळणार नाही. राज्य शासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभाग निकष तयार करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे 15-20 लाख नव्हे तर आता केवळ पाच लाखांचीच मदत शासन स्तरावरून होणार आहे. मात्र, गंभीर आजार आता पाचऐवजी 10 केले जाणार आहेत. 

राज्य शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य विभागाकडे दरमहा 60 मेडिकल बिले प्राप्त होतात. त्यामध्ये वर्ग एक ते चारचे बहुतांशी कर्मचारी मोठमोठ्या रुग्णालयात ठरावीक काळ उपचार घेतात आणि त्यांच्याकडून मेडिकल बिलापोटी 12 ते 18 लाखांपर्यंत मागणी होते. या पार्श्‍वभूमीवर शासन आता अवास्तव बिलांना लगाम घालत आहे. दुसरीकडे मात्र, पूर्वीच्या पाच गंभीर आजारांत आता नव्याने आणखी पाच आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच किरकोळ 27 आजारांमध्येही आणखी चार आजारांचा समावेश केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कर्करोग, किडनी प्रत्यारोपण, हर्ट, लंग्ज संबंधित आजारांबरोबरच आता दोन्ही फुफ्फुसांमधील पोकळीत आलेली गाठ, मधुमेह, रक्‍तदाब, एमाईन, ब्रेन ट्यूमर, डेंगी, स्वाइन फ्लू आणि रक्‍तासंबंधीच्या आजारांचा नव्याने समावेश करण्यात येणार आहे. 

दरवर्षी शंभरहून अधिक मेडिकल बिले तीन ते 12 लाखांपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सांकडे दाखल होतात. त्यातील कागदपत्रांची छाननी करून शासनाला सादर केली जातात. नव्याने करण्यात येणाऱ्या बदलाची माहिती लवकरच मिळेल, त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. 
- डॉ. सुमेध अंदुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT