the rice crop buying for this year comparatively less by rupees 1000 the farmers face the problem of crop rice in balgam 
पश्चिम महाराष्ट्र

भात खरेदीत व्यापारी करताहेत मनमानी ; शेतकऱ्याला बसतोय फटका

सकाळ वृत्तसेवा

कंग्राळी खुर्द (बेळगाव) : भारत कृषिप्रधान देश असतानाही शेतकऱ्यांच्या उत्पादनावर कोणतेही शासकीय किंवा संघटनेचे नियंत्रण नाही. त्यामुळे यंदाही भातदरात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे फटका बसत आहे. सध्या इंद्रायणीला  १,७०० ते १,८०० रुपये तर बासमतीला  २,४०० रुपये प्रतिक्विंंटल दर आहे. गतवर्षीच्या तुलनेने ही ५०० ते १,००० रुपयांपर्यंतची तफावत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

बेळगाव, खानापूर तालुके भातासाठी प्रसिद्ध असून खरीप हंगामात एकूण लागवड क्षेत्राच्या निम्म्या क्षेत्रात विविध जातींची भात पिके घेतली जातात. आर्थिक अडचणीमुळे सुगी झाल्याबरोबर शेतकरी भातविक्री करतात. विशेषकरून व्यापारी इंद्रायणी, बासमती, थोड्या प्रमाणात दोडगा भात खरेदी करतात. त्यामुळे भाताला मागील वर्षाच्या तुलनेने  १०० ते २०० रुपये वाढीव दर मिळावा, अशी अपेक्षा असते. परंतु, दराबाबत व्यापारीच सर्वेसर्वा असल्याने शेतकऱ्यांचे कोणीही ऐकत नाही. आर्थिक गरज असल्यामुळे व्यापारी मनमानी दर आकारुन शेतकऱ्यांना पट्टी देतात. यंदा रोगाने तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे सरासरी उतारा निम्म्यावरच आहे.

दरही २० टक्‍क्‍यांनी कमी असल्यामुळे भात उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अनुदानासह भाताची आधारभूत किंमत १,९०० रुपयांपेक्षा अधिक आहे. परंतु, एपीएमसी तसेच कृषी विभाग भात खरेदी केंद्र सुरू करण्यास उदासीनता दाखवत असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागासह शेतकरी संघटनेने भात दराबाबत जातीने लक्ष घालून पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

एकरी भात पिकाचा सरासरी खर्च व उत्पन्न
 

पेरणीपूर्व मशागत खर्च                 ३,००० रुपये
शेणखत २ ट्रॉल्या                        ५,००० रुपये
बियाणे खर्च.....२० किलो              २,५०० रुपये
लागवड मजुरी                            ४,००० रुपये
भांगलण खर्च                              ४,००० रुपये
रासायनिक खते खर्च                    ६,००० रुपये
औषधांचा खर्च                             ३,००० रुपये
कापणी व मळणी खर्च                  ५,००० रुपये
एकूण खर्च (सरासरी)                  ३२,५०० रुपये
यंदाचे सरासरी उत्पन                       १८ क्विंटल 

दर                             १,८०० रुपये प्रतिक्‍विंटल
एकूण उत्पन्न                              ३२,४०० रुपये

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT