Robbery In Close House In Nipani Hudko Colony
Robbery In Close House In Nipani Hudko Colony  
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी घरफोडीत पाच लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) - हुडको कॉलनीतील बसवेश्वरनगरमध्ये  महेश रामलिंग फल्ले यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा ऐवज लांबविला. त्यात सुमारे 13 तोळे सोने, चांदी व रोख 37 हजार रुपयांचा समावेश आहे. गुरुवारी (ता. 20) रात्री उघडकीस आलेल्या घटनेची नोंद श्री. बसवेश्वर चौक पोलिस स्थानकात झाली आहे. अक्कोळ रोडवरील बसवेश्वर पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावरच चोरी झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

याबद्दल घटनास्थळावरुन मिळालेली प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी (ता. 20) फल्ले हे नेहमीप्रमाणे कामानिमित्त चिक्कोडी न्यायालयात गेले होते. तर त्यांच्या पत्नी डॉ. विद्या महेश फल्ले या सायंकाळी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या आपल्या दवाखान्यात गेल्या होत्या. मुले बाहेर खेळण्यासाठी गेली होती. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास डॉ. फल्ले घरी आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. दरम्यान बसवेश्वर चौक पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घर फोडले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तिजोरीतील 'या' साहित्याची चोरी

अज्ञात चोरट्यांनी फल्ले यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या दाराची कडी मोडून व दार कापून घरात प्रवेश केल्याचे दिसून येते. घरात प्रवेश केल्यावर अज्ञातांनी थेट तिजोरी फोडून साहित्य विस्कटून टाकले आहे. तिजोरीतील 13 तोळे सोने व किरकोळ चांदी होती, ती लांबवली आहे. शिवाय 37 हजार रुपयांची रोकडही होती. दागिने व रोखड चोरट्यांनी लांबवली आहे. प्रामुख्याने 4 तोळ्याच्या बांगड्या, 3 तोळ्याचे गंठण यासह लहान दोन गंठण, ब्रेसलेट, चेन, लहान अंगठ्या, पैंजण, जोडवी, करंडा, गणपती मूर्ती अशा दागिन्यांचा त्यात समावेश आहे.

सराईत चोरटा असण्याची शक्यता

आज (ता. 20) सकाळी पोलिस उपाधिक्षक मिथुनकुमार, मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक, उपनिरीक्षक बी. जी. सुब्बापूरमठ यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी तपासणी केली. श्‍वान मात्र घराच्या पाठीमागील बाजुस घुटमळले. त्यामुळे या घटनेत सराईत चोरटा असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

परिसरात पोलिसांची निवासस्थाने

बसवेश्वरनगर, हुडको कॉलनी परिसरात अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची घरे आहेत. नजिकच पोलिस स्थानक आहे. तरीही येथे चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने भागाच्या सुरक्षेच्या प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. चोरटे बंद घरे लक्ष्य करीत आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT