पश्चिम महाराष्ट्र

महिला नगराध्यक्षा धावून आल्या 'त्यांच्या' मदतीला

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना अधिकार नसतानाही त्यांनी अपात्र करण्याचे पत्र दिले आहे. त्याद्वारे त्यांनी ठराविक ठेकेदारांच्या बिलावर स्वाक्षऱ्यांसाठी दबाव तंत्राचा वापर केला आहे. त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी तक्रार नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. त्याबाबत त्यांनी लेखी पत्र दिले असून, त्यांच्याशी संवादही साधला आहे. त्याबाबत येत्या 13 मार्चपर्यंत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी सिंह यांनी दिले आहे, असेही नगराध्यक्षा शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
ठेकेदारांच्या बिलावर स्वाक्षऱ्या करत नसल्याने अनेक ठेकेदारांच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्याचे लेखी कळवत मुख्याधिकारी डांगे यांनी नगराध्यक्षा शिंदे यांना नोटीस पाठवली. त्यामध्ये वेळेत बिलावर स्वाक्षऱ्या करत नाही. त्यामुळे ठेकेदारांचे देयकाची रक्कम प्रलंबित राहात आहे. वेळेत बिल न निघाल्याने ठेकेदार तक्रारी करत आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर ठेकेदारांच्या बिलावर स्वाक्षऱ्या कराव्यात, अन्यथा कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आपल्याला अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, असे नोटिशीत नमूद केले आहे. ती नोटीस प्राप्त होताच पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली. त्याला प्रत्युरादाखल नगराध्यक्षा शिंदे यांनीही खुलासा केला आहे. मुख्याधिकारी डांगे यांनी शिस्तभंग करत अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन ठेकेदारांच्या बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला आहे. त्यासोबत अपात्र करण्याची धमकी दिली आहे. मुख्याधिकारी डांगे यांचे ते गैरवर्तन आहे. चुकीचे आचरण व बेकायदेशीर वागणूक आहे. लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचा अवमान करणारे कृत्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करावा. त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी, असा आग्रह पक्षाकडे धरणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. 
 

मुख्याधिकाऱ्यांवर विधानसभेत हक्कभंग प्रस्तावासाठी आग्रह 
कऱ्हाड :  मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी शिस्तभंग अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन ठेकेदारांच्या बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला आहे. त्यासोबतच अपात्र करण्याची धमकी दिली आहे. मुख्याधिकाऱ्यांचे हे गैरवर्तन आहे. लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचा अवमान करणारे कृत्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करावा. त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी, असा आग्रह पक्षाकडे धरणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी दिली.

 Video : ...अन् खासदार श्रीनिवास पाटलांच्या डाेळ्यात अश्रू

मुख्याधिकारी श्री. डांगे यांनी ठेकेदारांच्या बिलावर स्वाक्षरा करत नसल्याच्या कारणावरून नगराध्यक्षांना अपात्रतेचा प्रस्ताव पाठविण्याची नोटीस दिली होती. त्याला नगराध्यक्षांनी प्रतित्युर दिले. सौ. शिंदे म्हणाल्या, ""मुख्याधिकारी डांगे हे त्यांच्या अधिकार क्षेत्राचे बाहेर जाऊन वेळोवेळी मला बेकायदेशीर पत्र पाठवितात. 5 मार्च रोजी त्यांनी मला पालिकेचे ठेकेदार व पुरवठादारांच्या बिलावर नगराध्यक्ष म्हणून फॉर्म नं. 64 वर स्वाक्षरी होण्यास विलंब झाल्याचे कारण दाखवत पत्र पाठविले आहे. तीन दिवसांत स्वाक्षरी का झाली नाही, याचा खुलासा केला नाही, तर कर्तव्यात कसूर केली म्हणून अपात्रतेचा प्रस्ताव पाठविणेत येईल, अशी त्यात लेखी धमकी दिली आहे. महाराष्ट्र अकाउंट कोड 1971 मध्ये नगराध्यक्षांना फॉर्म नं. 64 वर सही करण्यासाठी वेळेचे बंधन नाही. ज्या बिलाबाबत त्यांनी उल्लेख केलेला आहे, त्या बिलांबाबत माझ्याकडे तोंडी तक्रारी आल्या आहेत. त्याची खातरजमा करण्यासाठी त्या बिलांवर सह्या केलेल्या नाहीत. पालिकेच्या अनेक ठेकेदार, पुरवठादारांची बिले अद्याप प्रलंबित आहेत. फक्त विशिष्ठ ठेकेदारांच्या बिलांबद्दल मुख्याधिकारी आग्रही का आहेत? अन्य ठेकेदार, पुरवठादारांच्या प्रलंबित बिलांबाबत आग्रही का नाहीत? याचा खुलासा व्हावा. प्रलंबित असलेल्या बिलांबाबत संबंधित विभागाकडे विचारणा केली असता मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशशिवाय आम्ही तुम्हाला माहिती देणार नाही, अशी उत्तरे दिली जातात. ज्या बिलांबाबत त्यांनी पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. त्या तीन बिलांबाबत मुख्याधिकाऱ्यांचा आग्रह का आहे? नगराध्यक्षांना त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सूचित करणे किंवा त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा मुख्याधिकाऱ्यांना कोणताही अधिकार नाही. मात्र, केवळ महिला नगराध्यक्षा असल्यामुळे मुख्याधिकारी ते वारंवार अपमानित व दुय्यम दर्जाची वागणूक देत आहेत. नगराध्यक्षांना स्वाक्षऱ्या करण्याव्यतिरिक्त अन्य कर्तव्यही आहेत. त्या सगळ्याचे भान मुख्याधिकाऱ्यांना राहिलेले नाही. त्यामुळे दबाव आणून धमकी देण्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी शिस्तभंग केला आहे. त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन ठेकेदारांच्या फॉर्मवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला आहे. त्यासोबत अपात्र करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे डांगे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाहीसह विधानसभेत त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणावा, अशी पक्षाकडे आपण आग्रही आहोत. त्याबाबत माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. 

Coronavirus : पाचगणीतील शाळांनी घेतला हा निर्णय 

महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा मदतीला 

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना मुख्याधिकारी यांनी नोटीस दिली. त्याचा महबाळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी निषेध केला आहे. महिला नगराध्यक्षा म्हणून काम करताना दबाव आणून काम करण्याची पद्धत खूप चुकीची आहे. या विरोधात योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी केली आहे. सातारा सातारा सातारा सातारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT