Sadabhau Khot Sadabhau Khot
पश्चिम महाराष्ट्र

'कधीही अंमलात न येणारी योजना म्हणजे ठाकरे सरकारची कर्जमाफी'

महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना कधीही पूर्णपणे अंमलात न येणारी आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगली : राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातील (paschim maharashtra) अनेक जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर या आपत्तींत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या (farmers loan) रकमेत वाढ झाली आहे. मात्र यंदाही आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेला आर्थिक फटका बसला आहे. यामुळे विरोधकांकडून या प्रकरणी टीका होत आहे. कधीही पूर्णपणे अंमलात न येणारी योजना म्हणजे महाविकास आघाडी सरकारची (mahavikas aaghadi sarkar) कर्जमाफी योजना अशी खोचक प्रतिक्रीया शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधित ट्विट केले आहे.

ते म्हणतात, महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना कधीही पूर्णपणे अंमलात न येणारी आहे. शेतकरी वेगवेगळ्या संकटांना तोंड देत असताना सरकारने त्यांच्या कर्जमाफीसाठी केवळ 150 कोटींची तरतूद केली आहे. ही तरतुद म्हणजे पुन्हा एकदा कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांसोबत केलेला दगा आहे. अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ७०० कोटी रुपयांची आवश्यकता असताना १५० कोटींची तरतूद केल्याने सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना निधीअभावी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT