sangli political News 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली महापालिकेत त्रिशंकू; काँग्रेस-राष्ट्रवादीला ब्रेक, भाजपात उत्साह

भाजप महापौर निवडीवेळी बंडखोरी केलेल्या सातपैकी सहा जणांच्या अपात्रतेचा फैसला नक्की करणार आहे.

जयसिंग कुंभार,

भाजप महापौर निवडीवेळी बंडखोरी केलेल्या सातपैकी सहा जणांच्या अपात्रतेचा फैसला नक्की करणार आहे.

सांगली - महाविकास आघाडीची सत्ता उलथल्यानंतर सांगली महापालिकेत जोम धरत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उधळलेल्या सत्तेच्या वारूलाही लगाम बसला आहे. आणखी सव्वा वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका आहेत. आता पदाधिकाऱ्यांच्या उलथापालथी होणार नाहीत. मात्र, राज्यातील सत्तेच्या माध्यमातून भाजप पुन्हा एकदा महापालिकेच्या कारभारावर नियंत्रण मिळवणार आहे. त्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. मात्र, या सत्ताबदलाचे आगामी ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकांवर सावट पडणार आहे.

एकूण ४२ जागांसह सत्तेत आलेल्या भाजपचा महाविकास आघाडी सत्तेत येताच जयंत पाटील यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर, तर काँग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर झाले. त्यानंतरच्या स्थायी समितीच्या निवडणुकीतही ‘त्या’ कार्यक्रमाची भीती घालत सुरेश आवटी यांनी चिरंजीव निरंजन आवटी यांना सभापतिपद मिळवून दिले. त्यांच्या दबावापुढे भाजपला झुकावे लागले होते. त्यामुळे आजघडीला महापालिकेत तीन पक्षांत सत्तेची त्रिशंकू स्थिती आहे.

आता राज्यातील सत्तापालटानंतर स्थायी समितीवर भाजप निरंकुशपणे आपला ताबा मिळवू शकतो. मात्र, ते त्यांना महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत शक्य होणार नाही. या दोन्ही पदांचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. त्यातल्या सव्वा वर्षांचा कालावधी संपला आहे. मात्र, भाजप महापौर निवडीवेळी बंडखोरी केलेल्या सातपैकी सहा जणांच्या अपात्रतेचा फैसला नक्की करणार आहे. विभागीय आयुक्त स्तरावर ही सुनावणी सुरू आहे. तथापि, इथे अपात्र ठरल्यानंतरही बंडखोरांना पुन्हा न्यायालयाचा मार्ग मोकळा राहणार असल्याने हा सत्ताकाळ संपेपर्यंत तरी निकाल लागणार नाही, हे स्पष्ट आहे.

पदाधिकारी बदलाचे चित्र बदलणार नसले, तरी आयुक्तांमार्फत भाजप पुन्हा एकदा पालिकेच्या सत्तेवर आपला अंकुश प्रस्थापित करू शकेल. महापालिकेच्या सत्तेत बेलगाम झालेल्या राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आता आयुक्तांमार्फत चाप लावला जाणार, हे निश्‍चित. त्यासाठी विद्यमान आयुक्तांची बदली होऊ शकते. तथापि विद्यमान आयुक्त नितीन कापडणीस आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, यासाठी ‘फिल्डिंग’ लावत आहेत.

विधानसभेआधी महापालिकेचे मैदान आहे. ते जिंकणे आमदार गाडगीळ यांची पहिली कसोटी असेल. अर्थात त्यांच्यासमोर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यांचे गट उपगट, शिवसेना असे प्रबळ लढतीचे संमिश्र चित्र असेल. महापालिकेवरील सत्तेसाठी जयंत पाटील पुन्हा एकदा काँग्रेससोबत शड्डू ठोकतील. आमदार सुधीर गाडगीळ एकहाती सत्तेसाठी प्रयत्नशील असतील. काँग्रेसचे नेते विश्‍वजित कदम, जयश्री पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांचा गटा-तटाचा मेळ घालण्यातच अजूनही मोठी शक्ती खर्च पडते आहे.

आगामी निवडणुकांत ‘लिटमस टेस्ट’

महापालिकेच्या आधी सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायती व मिरज पंचायत समितीच्या निवडणुकांचेही मैदान आहे. हरिपूर, कर्नाळ, पद्माळे, नांद्रे, बुधगाव, माधवनगर, बिसूर, कावजी खोतवाडी, बामणोली, इनामधामणी, अंकली या ग्रामपंचायतींमध्ये स्वतंत्र भाजप म्हणून आता बस्तान बसले आहे. त्याचवेळी स्थानिक पातळीवरील समीकरणेही आहेत. या गावांमध्ये काँग्रेसचे परंपरागत गट आहेत.

राष्ट्रवादीनेही गेल्या पाच वर्षांत स्वतंत्र अस्तित्व तयार केले आहे. इथेही या तीनही पक्षांमध्ये मोठा संघर्ष असेल. २०१४ ते २०१९ या काळात सत्तेपासून वंचित राहिलेल्या दोन्ही काँग्रेसचे महाविकास आघाडीच्या सत्तेमुळे पुन्हा एकदा बाळसे धरू लागले होते. विखुरलेले कार्यकर्ते या पक्षाच्या नेत्यांभोवती गोळा होत होते, मात्र त्याला राज्यातील सत्तांतरामुळे पुन्हा ‘ब्रेक’ लागला आहे. आगामी अडीच वर्षे निवडणुकांचीच आहेत. या प्रत्येक निवडणुकीत प्राबल्याचा फैसला होणार आहे. ती सर्वांसाठी ‘लिटमस टेस्ट’च ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT