पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांने तयार केली डिझेलवरची बाईक

विजय पाटील

सांगली - वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग केला आहे. पेट्रोलची दुचाकी चक्क तो डिझेलवर चालवतो आहे. एका लिटरमध्ये ११० किलोमीटर इतके अॅव्हरेज मिळत असल्याचा दावा त्याने केला आहे. विशेष म्हणजे गेली दहावर्षे तो ही दुचाकी वापरतो आहे. मल्लापा भैराप्पा जाबगौड असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

जत तालुक्यातील बसर्गी येथील मल्लाप्पा यांनी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर डिझेलवर चालणारी दुचाकी तयार केली आहे. पेट्रोलचे वाढते दर आणि कमी मायलेज यापासून सुटका करुन घेतली आहे. मल्लाप्पा अवघे ५ वी पास  आहेत. पण दुचाकीत काही तांत्रिक बदल करून त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. 

डिझेलवर चालण्यासाठी गाडीत हे केले बदल

1. प्लगचा पाईंट वाढवले
२. कार्बोरेटरमध्ये बायपास अल्टरेशन 
३. जेट नट बदलला

गावापासून दूर असलेल्या शेतात मल्लापा आपल्या कुटुंबा समवेत राहतात .शेती हा मल्लापा यांचा मुख्य व्यवसाय आहे. शिवाय बोअरवेल दुरुस्त करण्याचे काम ही ते करतात. शेती कामासह अन्य कामासाठीही या दुचाकींचा वापर ते करत असतात. दुचाकीचे पिकअप ही इतर दुचाकी प्रमाणे दमदार आहे. मात्र हा प्रयोग सर्व दुचाकीमध्ये करणे शक्य नसून काही ठराविक दुचाकीमध्येच शक्य असल्याचे मल्लप्पा यांनी आवर्जून सांगितले आहे .

पेट्रोलचे अधिक असणारे दर, गाडीचे कमी मायलेज आणि गावापासून दूर असणारे पेट्रोल पंप यावर मात करण्यासाठी तसेच घरी ठेवण्यासाठी अतिरिक्त पेट्रोल मिळत नसल्याने दुचाकी डिझेलवर चालवता येते का याचा प्रयोग मला करावा वाटला. प्रथम अपयश आले पण नंतर काही तांत्रिक बदल करून त्यात मी यश मिळवले.

- मल्लापा जाबगौंड


 


 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT